T20 World Cup 2022: टी-20 वर्ल्ड कप टुर्नामेंटवर कोरोनाचं सावट, 'हा' दिग्गज प्लेअर कोविड पॉझिटिव्ह

T-20 Cricket World Cup 2022: टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात सुरू आहे. या वर्ल्ड कपवर कोरोनाचं सावट असल्याचं दिसून येत आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियात सुरू आहे टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप
  • ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपवर कोरोनाचं सावट

Cricketer Adam Zampa tests covid-19 positive: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2022 मधील मॅच झाली. या मॅचपूर्वी एक मोठी बातमी समोर आली. बातमी समोर आली की, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अ‍ॅडम झॅम्पा याला कोविड-19 ची लक्षणे दिसून आली आणि त्यामुळे तो मॅचमधून बाहेर झाला. (T20 world cup 2022 australian player adam zampa test covid positive read details in marathi)

श्रीलंकन टीमसोबत मॅच होण्यापूर्वी फास्ट बॉलर मिशेल स्टार्कने म्हटलं, "झॅम्पा ठिक आहे. आम्हाला खूपच कमी वेळेत चार वेगवेगळ्या राज्यांत मॅचेस खेळायच्या आहेत. त्यामुळे हे एक सावधगिरीचे पाऊल आहे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या नियमानुसार, कोविड-19 पॉझिटिव्ह असलेला प्लेअर मॅचमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

हे पण वाचा : म्हणून आपलं पहिलं प्रेम विसरता येत नाही

आयसीसी नियमानुसार खेळता येईल मॅचेस

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल (आयसीसी)च्या नियमानुसार, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये एखाद्या प्लेअरला कोविड-19 चा संसर्ग झाला असला तरी तो मॅच खेळू शकतो. काही दिवसांपूर्वीच आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल हा कोविड पॉझिटिव्ह झाला होता. मात्र, असे असतानाही तो श्रीलंकेच्या विरुद्ध मॅचमध्ये खेळताना दिसून आला होता. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅस्टन एगर याला मॅचमध्ये खेळण्याची संधी दिली आहे. गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो केवळ एकच मॅच खेलला होता आणि ती सुद्धा भारता विरुद्ध प्रॅक्टिस मॅच होती.

हे पण वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कधी करावे लग्न?

सौम्य लक्षणे

ऑस्ट्रेलियन टीम मॅनेजमेंटच्या मते, अ‍ॅडम झॅम्पा याला कोविडची गंभीर लक्षणे नाहीयेत तर सौम्य लक्षणे आहेत. मात्र, आता पुढील मॅचेसमध्ये अ‍ॅडम झॅम्पा खेळू शकेल की नाही याबाबत शंका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी