T-20 World Cup 2022: वर्ल्डकपमधील मोठा उलटफेर, झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवलं

T-20 World Cup 2022: T-20 वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा उलटफेर झाला आहे. कारण ग्रुप सामन्यांमध्ये झिम्बावेने पाकिस्तानला पराभूत केलं. अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानाचा पराभव केला आहे.

t20 world cup 2022 big upset in world cup zimbabwe beats pakistan
T-20 World Cup 2022: वर्ल्डकपमधील मोठा उलटफेर, झिम्बावेने पाकिस्तानला हरवलं  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • T-20 World Cup 2022 मध्ये झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर 1 रनने विजय
  • अटीतटीच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला केलं पराभूत
  • 130 धावांचं आव्हानही पाकिस्तानला करता आलं नाही पार

T-20 World Cup 2022: पर्थ: T-20 विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये एक मोठा उलटफेर झाला आहे. आपला पहिला सामना भारतासोबत गमवणाऱ्या पाकिस्तानवर झिम्बाब्वेने अवघ्या 1 रनने मात केली आहे. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानने झिम्बाब्वेला 129 धावांवरच रोखलं होतं. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी फक्त 130 धावांची आवश्यकता होती. पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तानला फक्त 128 धावांवरच रोखलं. भारतापाठोपाठ झिम्बाब्वेने केलेला पराभव हा पाकिस्तानसाठी नक्कीच मानहानीकारक आहे. (t20 world cup 2022 big upset in world cup zimbabwe beats pakistan)

झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या मेंडेवीर आणि एरवीन या दोन्ही सलामीवीरांनी डावाची सुरुवात जबरदस्त केली. पण हे दोघंही बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सेन विल्यमस याच्या 31 धावांच्या जोरावर झिम्बाब्वे 20 ओव्हरमध्ये 129 धावांपर्यंतच मजल मारु शकलं.

अधिक वाचा: T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप टुर्नामेंटवर कोरोनाचं सावट

मात्र, त्यानंतर झिम्बाबेच्या सर्वच खेळाडूंची प्रयत्न अक्षरश: पराकाष्ठा केली. ज्याच्या जीवावर झिम्बाब्वेने बलाढ्य पाकिस्तानला अवघ्या एका रनने पराभूत केलं. हा पराभव पाकिस्तानच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. कारण या पराभवामुळे पाकिस्तानचं या स्पर्धेत आव्हान संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

झिम्बाबेचे गोलंदाज ठरले हिरो 

या सामन्यात झिम्बाब्वेचे सर्वच गोलंदाज हे हिरो ठरले आहेत. पण सर्वात जास्त छाप सोडली ती फिरकीपटू सिकंदर रझा याने. कारण त्याने आपल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 25 धाव देत तीन महत्त्वाचे बळी घेतले. त्यातही त्याने अगदी मोक्याच्या क्षणी दोन अत्यंत महत्त्वाचे बळी घेतले. ज्यामुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला.

अधिक वाचा: पाकविरुद्ध धमाकेदार खेळीनंतर विराटची रँकिंग टॉप 10मध्ये

झिम्बाब्वेच्या सर्वच वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करत पाकिस्तानला सुरुवातीपासूनच बॅकफूटवर ढकललं. ज्यामुळे हा सामना झिम्बावेला जिंकता आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज नागरावा आणि ब्रॅड इव्हन्स यांनी 19व्या आणि 20व्या ओव्हरमध्ये तुफान मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना वेसण घातली आणि एका मोठ्या स्पर्धेत कमी धावसंख्या असताना आपल्या संघाला एक ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला.

पाकिस्तानी फलंदाज सपशेल अपयशी 

खरं तर पाकिस्तानसाठी हा सामना एका अर्थाने खूपच सोपा असा होता. कारण भारतासोबतच्या पराभवनंतर संघाचं मनोधैर्य वाढविण्यासाठी झिम्बाब्वेसोबतचा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची नामी संधी पाकिस्तानी संघाकडे होती. मात्र, पाकिस्तानी फलंदाज हे सपशेल अपयशी ठरले.

अधिक वाचा: किंग कोहलीची कमाल, टी20 वर्ल्ड कपमध्ये केला असा रेकॉर्ड की..

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हे दोघेही झटपट बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. फक्त शान मसूद याने 38 चेंडूत 44 धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी त्याला सिंकदर रझा याने बाद केलं. त्यानंतर सामना हा झिम्बाब्वेच्या बाजूने झुकला.

दुसरीकडे मधल्या फळीतील आणि तळाचे फलंदाज अजिबात चमकदार कामगिरी करु शकले नाही. या सगळ्याची परिणिती म्हणून झिम्बाब्वेने पाकिस्तानला साखळी सामन्यातच पाणी पाजलं. ज्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांचं मनोधैर्य आता पूर्णपणे खचलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी