T20 World Cup 2022: अ‍ॅडलेडच्या मैदानात सेमीफायनलसाठी भारत-इंग्लंड आमने-सामने, जाणून घ्या कशी असेल मैदानाची स्थिती?

आता अंतिम फेरीत  (final Match) पोहोचण्यासाठी त्याचा सामना आज म्हणजेच 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ( Australia)अ‍ॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर (Adelaide Cricket Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं आहे.

India-England semi-final match: How is the ground condition?
India-England semi-final Match: कशी आहे मैदानाची स्थिती   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचे संकट घोंघावत आहे.
  • फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं.
  • Accuweather.com च्या मते, संध्याकाळी अॅडलेडमध्ये पावसाची 5-10 टक्के शक्यता आहे.

IND vs ENG, Pitch Report : भारतीय क्रिकेट संघाने T20विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) उपांत्य फेरीत (Semifinal) धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत  (final Match) पोहोचण्यासाठी त्याचा सामना आज म्हणजेच 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ( Australia)अ‍ॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर (Adelaide Cricket Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असून त्यामुळेच या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. दरम्यान, भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचे संकट घोंघावत आहे.  (T20 World Cup 2022:  India-England semi-final at the Adelaide ground, know how the ground condition)

अधिक वाचा  : India vs England Live Score, T20 World Cup Semi Final: भारत वि. इंग्लंड सेमीफायनल थोड्याच वेळात

मॅचच्या आदल्या रात्री अ‍ॅडलेडमध्ये खूप पाऊस झाला होता. सकाळीही अ‍ॅडलेडमध्ये पाऊस पडत होता. सध्या हवामानाने कृपा दाखवली असून पाऊस थांबला आहे. अंदाजानुसार, उपांत्य फेरीचा सामना संध्याकाळी होईल तेव्हा पावसाची शक्यता नाही. Accuweather.com च्या मते, संध्याकाळी अ‍ॅडलेडमध्ये पावसाची 5-10 टक्के शक्यता आहे.परंतु हे देखील लक्षात घेतले पाहिजे ऑस्ट्रेलियामध्ये हवामान वेगाने बदलते. जर समजा पाऊस होण्याची शक्यता असली तरी भारतीय क्रिकेट प्रेमींनो नाराज होण्याची गरज नाही. कारण पावसामुळे सामना रद्द झाला, तरी टीम इंडियाच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे.

कोणाला मिळेल अंतिम सामन्याचं तिकीट 

सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या उपांत्य फेरीत भारतविरुद्ध इंग्लंड हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेडमध्ये आमने-सामने येणार आहेत. भारतीय संघाने सुपर-12 फेरीतील गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळवताना उपांत्य फेरी गाठली. सुपर-12 फेरीत त्याने फक्त एकच सामना गमावला आणि 4 सामने जिंकले. दरम्यान या मैदानावर पाऊस झाल्याने हे मैदान कोणाला अंतिम सामन्याचं तिकीट देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अधिक वाचा: T20 World Cup: रोहितने सांगितले, दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, सेमीफायनलमध्ये कोण खेळणाार

अ‍ॅडलेडची खेळपट्टी फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. पण सोबतच गोलंदाजांनाही फायदा मिळू शकतो.  येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 आहे, इतर मैदानांच्या तुलनेत ही बरीच जास्त आहे. फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यास ते सहज मोठी धावसंख्या उभारू शकतात. पण गोलंदाजही सुरुवातीच्या षटकातच विकेट्सची आशा करतील. अ‍ॅडलेड ओव्हलचे मैदान मोठे असल्याने गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.  

कसा आहे दोन्ही संघाचा  इतिहास?

टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत.  

कशी असू शकतो दोन्ही संघाची संभाव्य 11?

संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

संभाव्य इंग्लंडचा संघ  

अ‍ॅलेक्स हेल्स, जोस बटलर(कर्णधार), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी