T20 World Cup:टी20 वर्ल्ड कपमध्ये आग ओकतोय हा 23 वर्षांचा गोलंदाज, मोठमोठ्या फलंदाजांना केले चीत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 04, 2022 | 10:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup 2022:  टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये 23 वर्षीय एक भारतीय गोलंदाज विशेष यशस्वी ठरला आहे. या खेळाडूने आपल्या कामगिरीमागे एका मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचे समोर आले आहे. 

team india
टी20 वर्ल्ड कपमध्ये आग ओकतोय हा 23 वर्षांचा गोलंदाज 
थोडं पण कामाचं
  • टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये 23 वर्षीय भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आतापर्यंत यशस्वी ठरला आहे.
  • अर्शदीप सिंहने  सध्याच्या टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये नऊ विकेट मिळवल्यात.
  • यात पाकिस्तानविरुद्ध 3 बाद 32 अशी त्याची बेस्ट कामगिरी आहे. 

मुंबई:  टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022)मध्ये टीम इंडियाच्या(team india) एका गोलंदाजाने आपल्या जबरदस्त कामगिरीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा खेळाडू वयाच्या 23व्या वर्षी मोठमोठया फलंदाजांवर भारी पडत आहे. या खेळाडूने आपल्या घातक गोलंदाजीवर मोठे विधान केले आहे. हा खेळाडू या स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा फलंदाज आहे. T20 World Cup: 23 year old arshdeep singh best bowler of team india in world cup

अधिक वाचा - भिडे गुरूजींनी महिलांचा आदर करावा - अमृता फडणवीस

23 वर्षीय गोलंदाजाचा कहर

टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये 23 वर्षीय भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. अर्शदीप सिंहने  सध्याच्या टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये नऊ विकेट मिळवल्यात.  यात पाकिस्तानविरुद्ध 3 बाद 32 अशी त्याची बेस्ट कामगिरी आहे. 

असे बनवले स्वत:ला यशस्वी गोलंदाज

अर्शदीप सिंहने स्टार स्पोर्ट्सला सांगितले, माझे लक्ष नेहमी कामगिरीतील सातत्यावर असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही साधारण बॉल फेकण्याच्या स्थितीत नसता. मी बॉल नवा असू दे अथवा जुना दोन्ही बॉलने मला चांगली कामगिरी करायची आहे. मी गरजेच्या हिशाबोने विकेट घेतो अथवा धावांवर अंकुश ठेवतो.

अधिक वाचा -  'या' गोष्टीला चिडून हल्लेखोरानं इमरान खानवर झाडली गोळी

या व्यक्तीला दिले यशाचे क्रेडिट

अर्शदीप सिंहने पुढे बोलताना सांगितले, पारस म्हांब्रे(भारतीय संघाचे गोलंदाजी कोच) यांनी माझ्या गोलंदाजी रनअपवर काम केले. त्यांनी सांगितले की मी जर सरळ आलो तर माझ्या लाईनमध्ये अधिक सातत्य असेल. ऑस्ट्रेलियाच्या विकेटवर तुम्ही खराब लाईनसोबत गोलंदाजी करू शकत नाहीत. यामुळे मी सरळ येण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला त्याचे परिणामही दिसत आहेत. मला आशा आहे की मी या पेक्षा अधिक चांगले करू शकेन. 

म्हणून बांगलादेशविरुद्ध रोहितने अर्शदीपला दिली शेवटची ओव्हर

रोहित शर्माने सांगितले, जेव्हा अर्शदीप त्या सीनमध्ये आला तेव्हा आम्ही त्याला विकेट घेण्यास सांगितले. जसप्रीत बुमराह येथे नाही आहे अशातच कोणालाही आमच्यासाठी हे करावेच लागले असते. जबाबदारी तर घ्यायचीच होती. या युवा खेळाडूने पुढे येऊन हे केले. हे सोपे नव्हते. मात्र आम्ही त्याला यासाठी तयार केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी