T20 World Cup : सुपर १२, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा विजय

यूएईमध्ये सुरू असलेल्या टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सुपर १२ फेरीची सुरुवात आजपासून (शनिवार २३ ऑक्टोबर २०२१) झाली. या फेरीत पहिल्या दिवशी झालेल्या दोन मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा विजय झाला.

T20 World Cup : Australia won by 5 wkts against South Africa And England won by 6 wkts against West Indies
T20 World Cup : सुपर १२, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा विजय 
थोडं पण कामाचं
  • T20 World Cup : सुपर १२, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा विजय
  • ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि इंग्लंडचा मोईन अली मॅन ऑफ द मॅच
  • उत्तम धावगतीमुळे इंग्लंड ग्रुप वन मध्ये पहिल्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर

दुबईः यूएईमध्ये सुरू असलेल्या टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सुपर १२ फेरीची सुरुवात आजपासून (शनिवार २३ ऑक्टोबर २०२१) झाली. या फेरीत पहिल्या दिवशी झालेल्या दोन मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा विजय झाला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मॅच पाच विकेट राखून जिंकली. इंग्लंडने वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच सहा विकेट राखून जिंकली. उत्तम धावगती आणि दोन गुण मिळवत इंग्लंड ग्रुप वन मध्ये पहिल्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया दोन गुण मिळवत ग्रुप वन मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. उद्या (रविवार २४ ऑक्टोबर २०२१) ग्रुप वन मधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि ग्रुप टू मधील भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच होतील. T20 World Cup : Australia won by 5 wkts against South Africa And England won by 6 wkts against West Indies

अबुधाबीत झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ९ बाद ११८ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने १९.४ ओव्हरमध्ये ५ बाद १२१ धावा करुन मॅच जिंकली. या मॅचमध्ये ४ ओव्हरपैकी एक मेडन (निर्धाव) ओव्हर टाकणाऱ्या जोश हेझलवूडने १९ धावा देत दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना बाद केले. या उत्तम कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

दुबईत झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज विरुद्ध टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने १४.२ ओव्हरमध्ये सर्वबाद ५५ धावा केल्या. इंग्लंडने ८.२ ओव्हरमध्ये ४ बाद ५६ धावा केल्या. या एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडच्या मोईन अलीने ४ ओव्हरपैकी एक मेडन (निर्धाव) ओव्हर टाकली. त्याने १७ धावा देत वेस्ट इंडिजच्या दोन खेळाडूंना बाद केले. या उत्तम कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी