T20 वर्ल्डकप : भारताच्या पराभवाने ICCला मोठा फटका

T20 World Cup: defeated India is a big blow to ICC : टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमी फायनलच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. भारताच्या पराभवाचा आयसीसीला मोठा फटका बसला आहे.

T20 World Cup: defeated India is a big blow to ICC
T20 वर्ल्डकप : भारताच्या पराभवाने ICCला मोठा फटका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • T20 वर्ल्डकप : भारताच्या पराभवाने ICCला मोठा फटका
  • आर्थिक स्वरुपाचा फटका
  • वर्ल्डकप फायनलच्या तिकिटांच्या दरात घट

T20 World Cup: defeated India is a big blow to ICC : टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमी फायनलच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. आता फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड या टीम आमनेसामने असतील. पण भारताच्या पराभवाचा आयसीसीला मोठा फटका बसला आहे. हा आर्थिक स्वरुपाचा फटका आहे.

फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले असते तर तिकिटांसाठी उपलब्धतेपेक्षा जास्त मागणी आली असती. जास्त मागणीमुळे तिकिटांच्या दरात वाढ करणे सोपे झाले असते. पण आता वेगळी परिस्थिती आहे.

भारत फायनलमध्ये नसल्यामुळे आणि यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान पण संपले असल्यामुळे फायनलच्या तिकिटांच्या मागणीत घट झाली आहे. मागणीत घट झाल्यामुळे फायनलच्या तिकिटांच्या दरात आतापर्यंत 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे. पुढील काही तासांमध्ये तिकिटांच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तिकिटांच्या दरातील या मोठ्या घसरणीमुळे प्रत्येक तिकिटामागे आयसीसीला 6 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होणार आहे.

द्रविड ॲन्ड कंपनीला दिला ब्रेक

सेहवागने केले सवाल

आधी फायनलचे तिकीट 299 डॉलर म्हणजे 24 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकण्याचा निर्णय झाला होता. पण भारत सेमी फायनलमध्ये हरला. यानंतर चित्र बदलले. फायनलचे तिकीट आता 225 डॉलरमध्ये म्हणजे 18 हजार रुपयांत उपलब्ध आहे. 

मेलबर्न येथे रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी 20 वर्ल्डकप स्पर्धेची फायनल मॅच रंगणार आहे. ही मॅच सुरू होण्याआधी तिकिटांच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तिकिटांच्या दरातील घसरणीमुळे आयसीसीचे आर्थिक नुकसान अटळ आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी