T20 World Cup, ENG vs SA : आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तगड्या संघांमध्ये सामना, या तुल्यबळ लढतीकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 06, 2021 | 13:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

अजिंक्य इंग्लंडविरुद्ध विजय नोंदवण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवारी शारजाह येथे उतरेल.

T20 World Cup, ENG vs SA: Today's match between England and South Africa, cricket will be the focus of this match
T20 World Cup, ENG vs SA : आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तगड्या संघांमध्ये सामना, या सामन्याकडे क्रिकेटचे लक्ष असेल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासमोर स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये स्थान निश्चित करण्याचे आव्हान
  • इंग्लडने उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित
  • इऑन मॉर्गनच्या इंग्लंड संघाचा विजयी रथ पुढे नेण्याचा प्रयत्न

शारजाः आयसीसी टी-20 स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यातील अ गटातील लढतीत शनिवारी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासमोर स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये स्थान निश्चित करण्याचे आव्हान असेल. इंग्लंडने आता त्यांचे सर्व चार सामने जिंकले आहेत आणि +3.183 च्या निव्वळ धावगतीमुळे उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित आहे. चार सामन्यांत सहा गुणांसह दक्षिण आफ्रिका गटात तिसऱ्या स्थानावर आहे. (T20 World Cup, ENG vs SA: Today's match between England and South Africa, cricket will be the focus of this match)

उपांत्य फेरीची लढत 

या गटातून इंग्लंडशिवाय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला आहे. पण दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर आहे. अशा स्थितीत आफ्रिकन संघाला अंतिम चारमध्ये स्थान पक्के करण्यासाठी काय करावे लागेल हे कळेल.

या सामन्यात इंग्लंड विजयाचा दावेदार आहे

मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला कोणतीही संधी घ्यायला आवडणार नाही. त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना दणदणीत विजयाची गरज आहे. संघाच्या लयीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून अशा स्थितीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावणारा इंग्लंडचा संघ या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार असेल. बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजवर सलग तीन विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्या परफाॅर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याचा फायदा घेऊन इंग्लंडला गटातील मोहीम एका शानदार विक्रमावर संपवायची आहे. आतापर्यंतच्या सर्व उणिवा त्यांनी कमी-अधिक प्रमाणात दूर केल्या आहेत.

बटलरचे दक्षिण आफ्रिकेला आव्हान

इंग्लंडचा संघ पाकिस्तानशिवाय या स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक असल्याचे दिसते. मात्र, गटातील चारही सामने त्यांच्यासाठी सोपे नव्हते. संघावर कोणतीही अडचण आली की, कोणीतरी खेळाडू त्यांना त्यातून यशस्वीपणे बाहेर काढायचे. इंग्लंडची फलंदाजी जोस बटलर, जेसन रॉय, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांच्याभोवती फिरते. बटलरने गेल्या सामन्यात दोन शानदार पराक्रम केले. त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिले शतक झळकावले. तसेच खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. शनिवारी होणाऱ्या सामन्यात बटलरला पुन्हा एकदा आपला वेग कायम ठेवायला आवडेल.

मॉर्गनचे पुनरागमन इंग्लंडसाठी सकारात्मक 

इंग्लंडसाठी आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे कर्णधार इऑन मॉर्गन पुन्हा रुळावर आला आहे. त्याने मागील सामन्यात 36 चेंडूत 40 धावा केल्या आणि बटलरसोबत 112 धावांची भागीदारी केली. गोलंदाजीच्या आघाडीवर, मोईन अली आणि आदिल रशीद या फिरकी जोडीने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे तर ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी वेगवान विभागात संघासाठी चांगले योगदान दिले आहे.

दक्षिण आफ्रिकेचे भविष्य दुसऱ्याच्या हाती

दक्षिण आफ्रिकेचे पुढील फेरी गाठण्याचे भाग्य पूर्णपणे त्यांच्या हातात नाही. ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला नेट रन रेट मिळविण्यासाठी संघाला इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे किंवा वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने पराभूत करण्याची अपेक्षा करणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी विभागात क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा आणि डेव्हिड मिलर यांच्यावर अवलंबून असेल, तर गोलंदाजीचे नेतृत्व अव्वल T20 गोलंदाज तबरेझ शम्सीकडे असेल. एनरिक नॉर्खिया आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी त्याला या विभागात चांगली साथ दिली आहे.

दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (क), केशव महाराज, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, डब्ल्यू मुल्डर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्खिया, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, ताब्रेझ शम्सी, रासी व्हॅन डर डुसेन.

इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, टॉम कॅरेन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी