बीसीसीआयचा मोठा निर्णय, राष्ट्रीय निवड समिती बरखास्त

T20 World Cup fallout: BCCI sacks entire Chetan Sharma-led selection committee : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दारूण पराभव झाला. या अपयशाचे परिणाम दिसू लागले आहेत.

T20 World Cup fallout: BCCI sacks entire Chetan Sharma-led selection committee
बीसीसीआयचा मोठा निर्णय, राष्ट्रीय निवड समिती बरखास्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयचा मोठा निर्णय, राष्ट्रीय निवड समिती बरखास्त
  • नव्या राष्ट्रीय निवड समितीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू
  • 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत इच्छुक बीसीसीआयकडे अर्ज करू शकणार

T20 World Cup fallout: BCCI sacks entire Chetan Sharma-led selection committee : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने मॅच 10 विकेट राखून जिंकली आणि भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. या अपयशाचे परिणाम दिसू लागले आहेत. बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली. या समितीनेच वर्ल्ड कपसाठी टीम निवडली होती.

बरखास्त केलेल्या निवड समितीत चेतन शर्मा (उत्तर भारत), हरविंदर सिंह (मध्य भारत), सुनिल जोशी (दक्षिण भारत), देबाशीष मोहंती (पूर्व भारत) हे सदस्य होते. यापैकी चेतन शर्मा हे समितीचे अध्यक्ष होते. समितीच्या सदस्यांची नियुक्ती 2020 ते 2021 दरम्यान वेगवेगळ्या महिन्यांत झाली होती. 

अॅबी कुरुविला यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड समितीवर पश्चिम भारतातून कोणाचीही नियुक्त झाली नव्हती. साधारणपणे राष्ट्रीय निवड समितीवर नियुक्त झालेल्या प्रत्येक सदस्याला किमान 4 वर्ष काम करण्याची संधी मिळते. पण वर्ल्ड कपमधील पराभवानंतर समितीच बरखास्त करण्यात आली.

बीसीसीआयने नव्या राष्ट्रीय निवड समितीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय निवड समितीवर पुरुष सदस्यांची निवड सुरू आहे. या प्रक्रियेसाठी 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत इच्छुक बीसीसीआयकडे अर्ज करू शकणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी