T20 World Cup ऑस्ट्रेलिया 'वर्ल्ड चॅम्पियन', ८ विकेट राखून विजय

T20 World Cup Final Australia won by 8 wkts against New Zealand टी २० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करुन ऑस्ट्रेलियाचा संघ 'वर्ल्ड चॅम्पियन' झाला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड विरुद्धची मॅच ८ विकेट राखून जिंकली.

T20 World Cup Final Australia won by 8 wkts against New Zealand
T20 World Cup ऑस्ट्रेलिया 'वर्ल्ड चॅम्पियन', ८ विकेट राखून विजय 
थोडं पण कामाचं
  • T20 World Cup ऑस्ट्रेलिया 'वर्ल्ड चॅम्पियन', ८ विकेट राखून विजय
  • न्यूझीलंड - २० ओव्हरमध्ये ४ बाद १७२ धावा
  • ऑस्ट्रेलिया - २० ओव्हरमध्ये २ बाद १७३ धावा

T20 World Cup Final Australia won by 8 wkts against New Zealand । दुबईः टी २० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करुन ऑस्ट्रेलियाचा संघ 'वर्ल्ड चॅम्पियन' झाला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड विरुद्धची मॅच ८ विकेट राखून जिंकली.

टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला २० ओव्हरमध्ये ४ बाद १७२ वर रोखले. यानंतर ऑस्ट्रेलियाने १८.५ ओव्हरमध्ये २ बाद १७३ धावा करुन फायनल मॅच जिंकली. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून गुप्टिलने २८, मिचेलने ११, कॅप्टन असलेल्या विल्यमसनने ८५, फिलिप्सने १८, नीशामने नाबाद १३, सीफर्टने नाबाद ८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने ३ आणि झम्पाने १ विकेट घेतली. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने ५३, कॅप्टन असलेल्या फिंचने ५, मार्शने नाबाद ७७, मॅक्सवेलने नाबाद २८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २ विकेट घेतल्या.

मार्श मॅन ऑफ द मॅच आणि वॉर्नर मॅन ऑफ द सीरिज

फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून नाबाद ७७ धावांची खेळी करणारा मिचेल मार्श मॅन ऑफ द मॅच झाला तर संपूर्ण टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत उत्तम कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर मॅन ऑफ द सीरिज झाला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा जिंकला टी २० वर्ल्ड कप

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी २० वर्ल्ड कप जिंकला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २ वेळा आणि वन डे वर्ल्ड कप ५ वेळा जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने १९९९ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा वन डे वर्ल्ड कप जिंकला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक करणारा एकमेव संघ होण्याचा मान ऑस्ट्रेलियाने मिळवला आहे.

  1. ऑस्ट्रेलियाने जिंकलेले वन डे वर्ल्ड कप (५) - १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५
  2. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी (२) - २००६, २००९
  3. ऑस्ट्रेलियाने जिंकलेला टी २० वर्ल्ड कप (१) - २०२१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी