T20 World Cup for the Blind, India beat Bangladesh and won third successive title : कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि सुनील रमेश यांनी शतके केली. या शतकांच्या जोरावर भारताने फायनलमध्ये बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला. भारताने शनिवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दृष्टिहिनांचा टी 20 वर्ल्डकप जिंकला. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. कारण भारताने सलग तिसऱ्यांदा दृष्टिहिनांचा टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला.
सुनीलला फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. तोच B3 प्रकारात मालिकावीर झाला. अजयला B2 श्रेणीतील मालिकावीर तर बांगलादेशच्या मोहम्मद महमूद रशीदला B1 श्रेणीतील मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
बॅटिंगचा निर्णय घेताना भारताची सुरुवात खराब झाली कारण सलमानने चौथ्या ओव्हरमध्ये व्हाईस कॅप्टन डी वेंकटेश्वरला बाद केले. त्याच ओव्हरमध्ये त्याने ललित मीनाला बाद केले. यानंतर सुनील आणि अजय यांनी मॅचची सूत्रे हाती घेतली. दोघांनी बांगलादेशच्या बॉलरची दमछाक केली. मैदानात चौफेर फटकेबाजी केली. अजय 40 धावांवर बाद होता होता वाचला. यानंतर अजयने तुफान फटकेबाजी केली. बांगलादेशला एकही संधी मिळू दिली नाही.
सुनीलने फोर मारत त्याचे तिसरे शतक केले, तर अजयने डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये शतक केले. अजय आणि सुनिल यांनी 248 धावांती भागीदारी केली. भारताने 20 ओव्हरमध्ये 2 बाद 277 धावा केल्या. सुनील रमेशने नाबाद 136 तर अजय कुमार रेड्डीने नाबाद 100 धावा केल्या. बांगलादेशकडून सलमानने 41 धावा देत दोन विकेट घेतल्या. सुनीलने 63 बॉल खेळत 24 फोर आणि एक सिक्स मारत नाबाद 136 धावा केल्या तर अजयने 50 बॉल खेळून 18 फोर मारत नाबाद 100 धावा केल्या.
भारताने बांगलादेशपुढे 278 धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर सलमान आणि कॅप्टन मोहम्मद आशिकुर रहमान यांनी डावाची चांगली सुरुवात केली. पण धावांचा वेग वाढवणे त्यांना जमले नाही. भारतीय बॉलरनी प्रभावी बॉलिंग केली. यामुळे कमी बॉल आणि जास्त धावा असे कठीण लक्ष्य बांगलादेशपुढे निर्माण झाले.
ललित मीणाने मोहम्मद आशिकुर रहमानला २१ धावांवर बाद केले. बांगलादेशला 9 ओव्हरमध्ये 56 धावा करणे जमले होते. सलमानने आबिदसोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 आणि आरिफ उल्लासोबत तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.
आबिदने 18 आणि आरिफ उल्लाहने 22 धावा केल्या. सलमान 65 बॉल खेळून 77 धावा करत नाबाद राहिला. त्याने 7 डावात 425 धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून यंदाच्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली. बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 3 बाद 157 धावा करणे जमले.
Sanju Samson Offer:निवड समितीकडून वारंवार डावलल्या जाणाऱ्या संजूला आयर्लंडकडून ऑफर; पण..