T20 World Cup: सामना जिंकला का जिंकू दिला; भारत-अफगाणिस्तान सामन्यात मॅचफिक्सिंगचा दावा, एका व्हिडीओमुळे राडा सुरू

Match-Fixing in India-Afghanistan: भारताने (India) अफगाणिस्तानवर (Afghanistan) दणदणीत 66 धावांनी विजय मिळवला. भारताचा टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) हा पहिलाच विजय ठरला.

match-fixing in India-Afghanistan match
T20 World Cup: भारत-अफगाणिस्तान सामन्यात मॅचफिक्सिंग?   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • टी20 विश्वचषकातील भारताचा पहिला विजय
  • भारत- आफगाणिस्तानच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा ठरला सामनावीर
  • भारत-अफगाणिस्तानच्या सामन्या फिक्सिंग झाल्याची टीका

Match-Fixing in India-Afghanistan: आबुधाबी : भारताने (India) अफगाणिस्तानवर (Afghanistan) दणदणीत 66 धावांनी विजय मिळवला. भारताचा टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) हा पहिलाच विजय ठरला. पण या विजयानंतर भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात मॅच फिक्सिंग (Match-Fixing) झाल्याचा आरोप चाहत्यांकडून केला जातं आहे. या आरोपाला काऱण ठरलाय एका व्हिडीओ. मॅच फिक्सिंग झाली का नाही यावरून सोशल मीडियामध्ये याबाबत मोठा राडा सुरू आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये 

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सामन्याचा हा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय संघ फलंदाजी करत असून सामन्यातील ११ वे षटक टाकले जात असताना हा व्हिडीओ आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर आणि सामनावीर ठरलेला रोहित शर्मा एक फटका मारताना दिसत आहे. हा फटका मारल्यावर चेंडू अडवडण्यासाठी अफगाणिस्तानचा खेळाडू जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सीमारेषेपार जाणऱ्या या चेंडूला अडविण्यासाठी अफगाणिस्तानचा खेळाडूने डाय मारला. परंतु हातात येणारा चेंडू परत सीमेरेषेकडे ढकलला.  यामुळे  भारताला चार धावा मिळाल्या आहेत. या व्हिडीओनंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना फिक्स असल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे.

अफगाणिस्तानचे खेळाडू या सामन्यात अभिनय करत असून सामना फिक्स असल्याचा आरोप चाहत्यांनी यावेळी केला आहे. या व्हिडिओमध्ये जेव्हा चेंडू अफगाणिस्तानच्या खेळाडूजवळ आला तेव्हा त्याला तो अडवण्याची संधी होती. तो त्याने अडवलाही. पण त्यानंतर आपल्याच हाताने तो चेंडू सीमारेषेवर ढकलल्याचा आरोप यावेळी क्रिकेट चाहत्यांनी केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट मंडळांमध्ये चांगले संबंध आहेत.

भारताने बऱ्याचदा अफगाणितस्तानच्या क्रिकेट मंडळाला आणि खेळाडूंना मदतही केली आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानने हा सामना भारताला आंदण दिल्याचेही काही चाहते म्हणत आहेत. त्यामुळे भारताने सामना जिंकल्यावर सोशल मीडियामध्ये मॅच फिक्सिंगचा ट्रेंड सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. 

पण याबाबतचा कोणताही पुरावा मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या चाहत्यांकडे नाही. अफगाणिस्तानच्या खेळाडूकडून चुक नक्कीच झाली आहे, पण अशा चुका क्रिकेटमध्ये यापूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळे या सामन्यानंतर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात काहीच तथ्य नसल्याचेही म्हटले जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी