T20 World Cup : बाबर आझमबरोबर अन्याय झाला शोएब अख्तरचा आरोप; टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानतंर संतापला शोएब

T20 World Cup : रविवारी टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) अंतिम सामना (Final match ) न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये झाला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखत न्यूझीलंडला पराभूत करत आपणचं चॅम्पियन असल्याचं परत एकदा सिद्ध केलं,

Shoaib Akhtar's allegation that Babar Azam was wronged
बाबर आझमबरोबर अन्याय झाला शोएब अख्तरचा आरोप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
  • अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखत न्यूझीलंडला पराभूत केलं.
  • बाबर आझमने 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 303 धावा केल्या आहेत.

T20 World Cup : दुबई : रविवारी टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) अंतिम सामना (Final match ) न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये झाला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखत न्यूझीलंडला पराभूत करत आपणचं चॅम्पियन असल्याचं परत एकदा सिद्ध केलं, परंतु या विजयानंतर आरोप होऊ लागले आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज (Former Pakistan fast bowler) शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) अंतिम सामन्यानंतर आरोप केला पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमबरोबर या टुर्नामेंटमध्ये अन्याय झाला आहे. 

दुबईत झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला कप मिळवून देण्याचं काम मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरने केलं. मार्शने नाबाद राहत 77 धावांची खेळी केली. तर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूंमध्ये 53 धावा करत विजयाचा पाया रचला. मार्शच्या धमाकेदार खेळीमुळे त्याला (Man of the Match) सामनावीर घोषित करण्यात आलं. तर संपूर्ण विश्वचषकात शानदार फलंदाजी करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (Player of the Tournament) म्हणून घोषित करण्यात आलं. वॉर्नरला हा पुरस्कार देणं योग्य नसल्याचं शोएब अख्तरने सामन्यानंतर म्हटलं आहे.  फायनलनंतर जेव्हा डेव्हिड वॉर्नरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कार देण्यात आला तेव्हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर संतापला आणि त्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.  

डेव्हिड वॉर्नरला नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर बाबर आझम याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळायला हवा होता, असे शोएब अख्तरचे मत आहे. त्याच्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही अख्तरने केला आहे.  अंतिम फेरीनंतर सादरीकरण समारंभात डेव्हिड वॉर्नरला पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा शोएब अख्तरने लगेचच ट्विट केले आणि लिहिले, "बाबर आझमला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' म्हणून घोषित केले जाईल याची मला उत्सुकता होती. अत्यंत अन्यायकारक निर्णय."

शोएब अख्तर प्रत्येक सामन्यानंतर कोणत्या ना कोणत्या प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु पुरस्कारावरुन त्याने केलेलं ट्विट हे हास्यास्पद आहे,, कारण अनेक जागतिक दर्जाच्या दिग्गजांच्या ज्युरी पॅनेलने या पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड केली आहे.  दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच बाबर आझमने 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 303 धावा केल्या, पण दुसऱ्या क्रमांकावर असलेला डेव्हिड वॉर्नरने 289 धावा केल्या आहेत.  बाबरपेक्षा तो  14 धावांनी मागे होता.  पण वॉर्नरने वेस्ट इंडिज (नाबाद ८९), पाकिस्तान (४९) आणि न्यूझीलंड (५३) यांच्याविरुद्धच्या शेवटच्या तीन मोठ्या सामन्यांमध्ये सलग तीन शानदार खेळी खेळली कारण त्याचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यानंतर विजेतेपद पटकावले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी