T20 World Cup : पाकिस्तानसाठी कोहली किंवा रोहित नव्हे तर हे 2 भारतीय सर्वात घातक

T20 World Cup ind vs pak : टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. यापूर्वी पाकिस्तानचे फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन यांनी केएल राहुल आणि रिषभ पंत यांना पाकिस्तानसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असल्याचे म्हटले आहे.

T20 World Cup: These 2 Indians are the most dangerous for Pakistan, not Kohli or Rohit
T20 World Cup : पाकिस्तानसाठी कोहली किंवा रोहित नव्हे तर हे 2 भारतीय सर्वात धोकादायक,   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टी 20 विश्वचषकात टीम इंडियाला पाकिस्तान कधीही हरवू शकला नाही.
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार
  • पाकला कोहली किंवा रोहित नाही तर या 2 भारतीय खेळांडूंपासून धोका

T20 World Cup ind vs pak । दुबई :  टी -20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने शानदार पदार्पण केले आहे. दोन्ही सराव सामन्यांमध्ये  संघाने नेत्रदीपक कामगिरी करुन संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, दुसऱ्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये 24 ऑक्टोबरला भारतनआणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. आता पर्यंत टी -20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ कधीही टीम इंडियाला हरवू शकला नाही. दरम्यान, पाकिस्तानचे फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन यांनी केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोन भारतीय क्रिकेटरपासून पाकिस्तान क्रिकेट संघ सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. (T20 World Cup: These 2 Indians are the most dangerous for Pakistan, not Kohli or Rohit)

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटवर जवळून लक्ष ठेवणाऱ्या मॅथ्यू हेडनला केएल राहुल आणि ऋषभ पंत चांगली कामगिरी करू शकतील, असा विश्वास आहे. ते म्हणाले, 'मी केएल राहुलला सातत्याने चांगली खेळी करताना पाहिले आहे आणि तो पाकिस्तान संघासाठी मोठा धोका असेल. मी त्याचा संघर्ष आणि त्याचे वर्चस्व दोन्ही छोट्या स्वरूपात पाहिले आहे. '' मॅथ्यू हेडन म्हणाले, 'मी ऋषभ पंतलाही पाहिले आहे. तो आक्रमक गोलंदाजांसमोर चांगली खेळी करतो. 

धोनी आणि मॉर्गनने कर्णधारपद चांगले सांभाळले

ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान कॅप्टन महत्त्वाची भूमिका बजावेल. मॅथ्यू हेडन म्हणाले की, या मोठ्या सामन्यात चुकीला वाव खूप कमी असेल, त्यामुळे सामन्याच्या निकालात नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असेल. हेडनने महेंद्रसिंग धोनी आणि इऑन मॉर्गनचे उदाहरण दिले. मॅथ्यू हेडन म्हणाले, "त्याची वैयक्तिक कामगिरी त्याच्या पूर्वीच्या आकडेवारीप्रमाणे चांगली नव्हती, परंतु त्यांनी ज्या प्रकारे आपल्या संघाचे नेतृत्व केले आणि स्वतःला सावरले, त्यांनी त्यांच्या संघांना यूएईच्या परिस्थितीमध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचवण्यात मदत केली."


प्रत्येकजण बाबरवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल

हेडन म्हणाला, "मला वाटते की आगामी सामन्यांमध्ये नेतृत्व महत्वाचे असेल, कारण यूएईच्या परिस्थितीत, त्रुटीला वाव खूपच कमी असेल आणि परिस्थिती तेथे सोपी नसेल." फलंदाजांना  सामन्यात भूमिका बजावावी लागेल. “ बाबरवर कर्णधार आणि फलंदाज म्हणून  अतिरिक्त दबाव असेल कारण त्याला लक्ष्य केले जाईल आणि प्रत्येकजण त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल. बाबरला त्याची फलंदाज आणि कर्णधाराची भूमिका पार पाडावी लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी