T20 World Cup | Virat Kohli म्हणतो, देशात काय वातावरण आहे याचा आम्हाला पडत नाही काहीही फरक!

Virat Kohli | विराटने स्पष्टपणे म्हटले आहे की 'देशात काय वातावरण याच्याशी त्याला देणेघेणे नाही आणि कोणी काय बोलते आहे याच्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही.' आम्ही खेळाडू इतर गोष्टीपासून स्वत:ला अलिप्त करत क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करतो.

Virat Kohli
विराट कोहली 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानविरुद्धच्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत दारुण पराभवानंतर भारतीय संघावर टीका
  • देशभरातील नकारात्मक चर्चेवर विराट कोहलीने व्यक्त केले मत
  • आपले लक्ष क्रिकेटवर असून इतर कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नसल्याचे विराटचे म्हणणे

T20 World Cup | नवी दिल्ली : भारताच्या क्रिकेट संघाचा (Indian Cricket team) पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan)आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) दारुण पराभव झाला. भारताला पाकिस्ताने १० गडी राखून (India Lost match to Pakistan) हारवले. या पराभवाने क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची नाराजीची भावना निर्माण झाली. मात्र या सर्व प्रकारावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे म्हणणे आहे की 'काय करायचे हे मला माहित आहे, मला कोणी सल्ला देण्याची आवश्यकता नाही.' विराटने स्पष्टपणे म्हटले आहे की 'देशात काय वातावरण याच्याशी त्याला देणेघेणे नाही आणि कोणी काय बोलते आहे याच्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही.' न्यूझीलंडशी होणाऱ्या भारताच्या सामन्याआधी (India vs New Zealand match) विराटने म्हटले की माझ्या दृष्टीने जर विश्वचषक जिंकायचा असेल तर प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तुम्ही असे ठरवू शकत नाही की एखाद्या संघाविरुद्ध चांगले खेळायचे आणि दुसऱ्या संघाविरुद्ध खराब खेळायचे. असे आम्ही कधाही खेळत नाही, खेळलेलो नाही आणि यापुढेही खेळणार नाही. विश्वचषक जिंकण्यासाठी तुम्हाला त्यादिवशी चांगला खेळ करायचा असतो.  (T20 World Cup: Virat Kohli Says, we do not care what others are saying)

आम्ही इतरांप्रमाणे विचार करत नाही

विराट कोहली पुढे म्हणाला की 'मी आधी सांगितल्याप्रमाणे कोण काय बोलते आहे याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. मला माहीत आहे की आमचे चाहते आम्हाला खूप प्रोत्साहन देत असतात आणि मी त्या लोकांना याचे श्रेय देईन ज्यांना आमची परिस्थिती माहीत आहे. आम्हाला अजून आणखी क्रिकेट सामने खेळायचे आहेत. ज्या लोकांमध्ये संयम, धैर्य नसते ते लोक लवकर घाबरतात. त्यांना वाटते आता सर्वकाही संपले. मात्र आम्ही असा विचार करत नाही. जर आम्ही लोक इतरांप्रमाणे विचार करू लागलो तर आम्ही जगातील सर्वोत्तम संघ राहणार नाही.'

आमचे लक्ष फक्त खेळावर

आपले मत मांडताना विराट म्हणाला, आम्ही खेळाडू इतर गोष्टीपासून स्वत:ला अलिप्त करत क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करतो. मग आम्ही हारो किंवा जिंको. एक संघ म्हणून आम्ही प्रत्येकवेळेस कमबॅक केले आहे. त्यामुळे आम्हाला काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. खेळाडू म्हणून ही नाही आणि संघ म्हणूनदेखील नाही. देशात काय वातावरण आहे, लोक काय विचार करत आहेत याचा आमच्या संघावर काहीही परिणाम होत नाही, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. मी आधीदेखील सांगितले आहे आणि आतादेखील सांगतो की लोक काहीही बोलले तरी आम्हाला त्याच्यामुळे काहीही फरक पडत नाही. संघ म्हणून काय करायचे आहे ते आम्हाला चांगलेच माहीत आहे. या स्पर्धेत आणि पुढेदेखील क्रिकेटमध्ये काय करायचे आहे हे आम्हाला माहीत आहे.'

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर टिकेची झोड उठली होती. क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले होते आणि संतापलेदेखील होते. या सर्व प्रकाराबद्दल बोलताना विराटने त्याची भूमिका आणि मत स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानचा दणदणीत विजय

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या टीम इंडियाची टी-२० वर्ल्डकपमधील सुरूवात खराब झाली. भारताला सुपर १२ राऊंडच्या पहिल्या सामन्यातच पाकिस्तानकडून १० विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. दुबईच्या आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला सुरूवातीलाच धक्के बसल्यानंतर त्यांना ७ विकेट १५१ धावा करता आल्या. त्यानंतर धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवा यांनी जबरदस्त फलंदाजी केली आणि १७.५ ओव्हरमध्ये कोणताही विकेट न गमावता आपल्या संघाला १० गडी राखून अभूतपूर्व विजय मिळवून दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी