T20 WorldCup PAKVs AUS : 'तू शिया आहेस म्हणून कॅच सोडला', हसन अलीच्या चुकीमुळे त्याच्या भारतीय पत्नीला नेटकऱ्यांनी घातल्या शिव्या

T20 WorldCup  PAKVs AUS :  टी20 विश्वचषका (T20 World Cup) च्या उपांत्य फेरी (Semifinals) च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) ऑस्ट्रेलिया संघा (Australia Team) कडून पराभव (Defeat) स्वीकारावा लागला.

T20 WorldCup  PAKVs AUS  Dropped the catch because you are a Shia
कॅच सुटला म्हणून हसन अलीच्या पत्नीला दिल्या जातायेत शिव्या   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात केली
  • हसन अलीने निर्णायक क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडला,
  • शिया मुस्लिम आणि भारतीय पत्नी असल्याने पाकिस्तानी गोलंदाजावर टीका केली जात आहे.

T20 WorldCup  PAKVs AUS :  दुबई/नवी दिल्‍ली : टी20 विश्वचषका (T20 World Cup) च्या उपांत्य फेरी (Semifinals) च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) ऑस्ट्रेलिया संघा (Australia Team) कडून पराभव (Defeat) स्वीकारावा लागला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 177 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 19 षटकांतच पूर्ण केले. शेवटच्या षटकांमध्ये मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यांनी जबरदस्त खेळी करत पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर केलं. परंतु या पराभवाचं खापर हसन अलीच्या डोक्यावर फोडलं जात आहे. कोणत्याही संघात 11 खेळाडू असतात त्यामुळे कोणत्या एका खेळाडूला पराभवासाठी कारणीभूत ठरवणं हे चुकीचे आहे. 

त्यात सध्या चाहते टीका करताना पातळी विसरून धर्म, जात, किंवा कुटुंबियांनावर खालच्या पातळीवर टीका करतात. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले होते, त्यावेळी भारतीय गोलदांज मोहम्मद शमीवर टीका होत होती. आज शमीच्या जागेवर पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली असून त्याच्या पत्नीलाही नेटकरी शिव्या घालत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हसन अलीकडून मॅथ्यू वेडचा झेल सुटला. वेडने पुढच्या तीन चेंडूत तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत नेले.  

आता पाकिस्तानी ट्विटर आणि इंस्टाग्राम हसन अलीविरोधात लज्जास्पद टिप्पणीने भरले आहेत. हसन अली शिया आहेत. त्याच्या जातीवरुन टीका केली जात आहे. याशिवाय हसन अलीची भारतीय पत्नी सामिया यांनाही ट्रोल्सने सोडले नाही. सोशल मीडियावर सामियाबद्दल खूप वाईट कमेंट येत आहेत. हसन अलीला पाकिस्तानात 'देशद्रोही' म्हटले जात आहे. जसे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खराब गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीला बोलले जात होते. तथापि, नंतर हे स्पष्ट झाले की शमीवरील अशा बहुतेक कमेंट्स पाकिस्तानी युजर्सच्या होत्या.

hasan troll

शिया मुस्लिम हसन अली आणि त्याची भारतीय पत्नी

हसन अली आणि त्याची पत्नी सामिया आरजू यांच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर पाकिस्तानी युजर्सच्या घाणेरड्या कमेंट्स येत आहेत. कोणी  त्याला विचारत आहे की, त्याने उपांत्य फेरीत धावा काढण्यासाठी किती पैसे घेतले. काही लोकांनी इन्स्टाग्रामवरील 'हँगिंग' पोस्ट्सवरही आरोप केले. अलीच्या भारतीय पत्नीविषयी आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे. तर काहींना हसन अलीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हसन अली पाकिस्तानात येताच त्याला गोळ्या घाला अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. 

हसन अलीवर टीका


शमी आणि आता हसन अली...

शमीबद्दलही 'देशद्रोही' अशा अनेक कमेंट्स आल्या होत्या. माजी क्रिकेटपटूंसह टीम इंडियाचे खेळाडूही शमीसोबत उभे दिसले. पण हसन अलीला पाठिंबा देणारे कमी लोक आहेत. तर शमीवर केलेल्या बहुतांश कमेंट्स पाकिस्तानी युजर्सनी केल्या होत्या, अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता. आता तेच लोक हसन अलीच्या धर्माबद्दल आणि त्याच्या भारतीय पत्नीबद्दल वाईट लिहित आहेत.

हसन अलीवर टीका

काही भारतीय वापरकर्त्यांनी हसन अलीला आपले प्रेम दिले आहे. धर्माच्या नावावर विष ओकणारे पाकिस्तानी वापरकर्ते कदाचित विसरले असतील की एक खेळाडू म्हणून तुमचा एखादा दिवस वाईट असू शकतो. गुरुवार हाहसन अलीचा दिवस नव्हता. जर संपूर्ण पाकिस्तानी संघ मिळूनही पराभव टाळू शकला नाही, तर हसन अलीला एकट्याला का टार्गेट केले जात आहे? त्याच्या पंथाचा आणि पत्नीचा या सगळ्याशी काय संबंध?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी