T20WC2022 Prediciton: टी20च्या विश्वचषकाच्या महाअंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान आमने-सामने

अ‍ॅडलेडच्या मैदानात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडने आज दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी धूळ चारली. नेदरलँडने दिलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 145 धावाच करता आल्या.  या पराभवामुळे आफ्रिका विश्वचषकातून बाहेर पडला. यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सुरू होण्याआधीच भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे.

Chances of India-Pakistan coming face-to-face in the T20 World Cup Grand Final
अंतिम सामन्यातही भारतासमोर पाकचं आव्हान?   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सेमीफायनलमध्ये पाकिस्तानही आपलं स्थान निश्चित करु पाहत आहे.
  • तीन सामन्यांतील विजयासह भारताचे सध्या 6 गुण आहेत.
  • ुणांसह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

T20WC2022 : टी20 विश्वकपमध्ये आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांमध्ये क्रिकेटप्रेमींना मोठे धक्के बसले आहेत. कोणता संघ बाजी मारेल हे सांगता येत नाहीये. सगळ्यात दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ विश्वचषकातून बाहेर झाला तर नेदरलँडने (Netherlands) 13 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे  भारताने उपांत्य फेरीत  (semi-finals) प्रवेश झाला आहे. आता सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा ह्या अंतिम सामन्यांच्या पाईट टेबलकडे लागले आहे. या सामन्यात भारत-पाकिस्तान हे संघ आमने-सामने येतील असा अंदाज अनेक जाणकार वर्तवत आहेत. पण हा अंदाज खरा ठरतोय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  यासाठी आपण सामन्यांच्या पाईटटेबल जाणून घेऊ.  (T20WC2022: Chances of India-Pakistan coming face-to-face in the T20 World Cup Grand Final )

अधिक वाचा  : चेटकीण समजून गावकऱ्यांनी दलित महिलेला जाळलं जिवंत

भारताचा सेमीफायनलमधील प्रवेश 

अ‍ॅडलेडच्या मैदानात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडने आज दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी धूळ चारली. नेदरलँडने दिलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 145 धावाच करता आल्या.  या पराभवामुळे आफ्रिका विश्वचषकातून बाहेर पडला. यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सुरू होण्याआधीच भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. तीन सामन्यांतील विजयासह भारताचे सध्या 6 गुण आहेत, या गुणांसह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

अधिक वाचा  : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात- उद्धव ठाकरे

दरम्यान सेमीफायनलमध्ये पाकिस्तानही आपलं स्थान निश्चित करु पाहत आहे. यासाठी पाकिस्तानला बांगलादेशला मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. या विजयाने पाकिस्तान उपांत्यफेरीत जाईल. परंतु आपण हे विसरून चालणार नाही की, या टी20 विश्वचषकात खूप आश्चर्यकित करणारे सामने झाले आहेत. आयर्लंड संघ इंग्लंडला हरवू शकतो. दोन वेळा T20चा विश्वविजेता ठरलेला वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडू शकतो, मग काहीही होऊ शकते.

दरम्यान, सेमीफायनलमध्ये इंग्लँडसोबत भारताचा सामना होऊ शकतो. तसेच जर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचली तर  पाकिस्तानने आपल्या प्रतिस्पर्धाशी सामना जिंकला तर दोन्ही संघ 13 नोव्हेंबरला परत आमने-सामने येऊ शकतात. सध्या आम्ही हे सांगत आहोत, पण ते घडेल की नवीन काही घडेल, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. सध्या तरी प्रतीक्षा करुन टीव्हीला चिकटून राहणे चांगले नाही का. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी