धाव बाद होण्याची चूक फखर झमानची की क्किंटनची; वाचा काय आहे सत्य

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये झालेला दुसरा एकदिवशीय(ODI) सामना सध्या चर्चेत आहे.

Tabraiz Shamsi reveal what happened in quinton de kock fakhar zaman
धाव बाद होण्यात फखर झमानची चूक की क्किंटनची  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • फलंदाजाचे काम धाव पुर्ण करण्याचं असतं - तबरेझ शम्सी
  • क्रिकेटर तबरेझ शम्सीचं विवादित धाव बादेवर ट्विट
  • मेलबर्न क्रिकेट क्लबचं (एमसीसी) पंचांकडे बोट

नवी दिल्ली  : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये झालेला दुसरा एकदिवशीय(ODI) सामना सध्या चर्चेत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान (Fakhar Zaman) १९३ धावांवर ज्याप्रकारे धाव बाद झाला त्याची सर्व क्रिकेट विश्वात मोठी चर्चा होत आहे. जेव्हा फखर झमान आपली धाव पुर्ण करत होता त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्किंटन डी कॉकने (Quinton de Kock) क्षेत्ररक्षकाकडे इशारा करुन त्याला चकमा दिला. जेव्हा फखर झमान मागे वळून पाहू लागला तेव्हा हातात चेंडू घेऊन उभा असलेल्या क्किंटनने त्याला धाव बाद केले.(Tabraiz Shamsi reveal what happened in quinton de kock fakhar zaman controversial run out)

धाव बाद वादाप्रकरणी एमसीसीचं पंचांकडे बोट

दरम्यान याविषयी अनेकांचे वेगवेगळे मत आहेत.क्किंटनला पाठिंबा देताना दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर तबरेझ शम्सी (Tabraiz Shamsi) क्किंटनने असे का केले हे सांगितले. तर दुसरीकडे शोएब अख्तर आणि वकार युनिस सारख्या पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटरांनी याला चुकीचे धाव बाद म्हणत नियामांविषयी विचारणा केली. त्याचवेळी क्रिकेट नियमांचे संरक्षक मेलबर्न क्रिकेट क्लबने (MCC) पंचांवर निर्णय सोडला. दरम्यान क्किंटन डी कॉकने असे का केले असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. 

 

क्रिकेटर तबरेझ शम्सीने सांगितलं सत्य

दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटर तबरेज शम्सी यांनी या विवादित धाव बादवर क्किंटन डी-कॉकचा बचाव केला. त्यांनी ट्विट करत डी कॉकला पाठिंबा दिला. शिवाय क्किंटनने असं का केले हेही सांगितले.

" मला फक्त हे स्पष्ट करायचं आहे की, क्किंटन डी कॉक फलंदाजाशी बोलत नव्हता आणि नाही तो त्याच्याकडे इशारा करत होता. फक्त तो क्षेत्ररक्षकाला सांगत होता की, नॉन स्ट्राइक एंडला कव्हर कर. फलंदाज मागे वळून पाहण्यात क्किंटनची काही चूक नाही. फलंदाजाचं धाव पुर्ण करण्याचं काम होतं आणि त्याने करायला हवं होतं. पण हा तिरस्कार करणं थांबवा आणि क्किंटनला एकटं सोडा"

त्यानंतर तबरेज यांनी आणखी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी लिहिलयं की, "आपण फखर झमानच्या दमदार खेळीकडे दुर्लक्ष करायला नको. त्याला आपण त्याच श्रेय दिलं पाहिजे. पण फलंदाजाने आपली धाव पुर्ण केली पाहिजे होती बाकी काही नाही".पण जे झाले ते झालं फलंदाजाच्या करिअरमध्ये अशी संधी नेहमी येत नाही जेव्हा तो द्विशतकाजवळ असतो. फखर झमान पाकिस्तानकडून इतिहास करण्यात फक्त ७ धावा दूर होता. पण तो ते यश आपल्या नावावर करू शकला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी