'हा' आहे जगातील सर्वात उंच क्रिकेटर, उंची ऐकून व्हाल अवाक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 07, 2019 | 18:29 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Tallest cricketer: 7.5 फूट उंची असलेल्या या क्रिकेटरचं नाव आहे मोहम्मद मुदस्सर. 21 वर्षांचा मोहम्मद फास्ट बॉलर असून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. मोहम्मद मुदस्सर हा लाहोरचा निवासी आहे. 

tallest cricketer mohammad mudassir 7ft 5inch height lahor qalandars sports news marathi
Cricketer Mohammad Mudassir  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • 7.5 फूट उंची असलेल्या मदस्सरने सर्वांची मनं जिकण्यास सुरुवात केलीय
  • मुदस्सरची नेटिजन्समध्ये जोरदार चर्चा
  • आपल्या उंचीमुळे मुदस्सर सोशल मीडियात हिट 
  • पाकिस्तान सुपर लीग (PSL) फ्रेंचायजी असलेल्या लाहोर कलंदर्सने सात फूट चार इंच उंची असलेल्या या बॉलरला संधी दिलीय

कराची: पाकिस्तान सुपर लीग (PSL)ची फ्रेंचायजी लाहोर कलंदर्सने पाकिस्तानमधील सर्वात उंच बॉलरचा शोध घेतला आहे. या तरुण क्रिकेटरचं नाव आहे मोहम्मद मुदस्सर. 21 वर्षांचा मोहम्मद मुदस्सर हा लाहोरचा राहणारा आहे. लाहोर कलंदर्स ही फ्रेंचायजी आपल्या या तरुण आणि सर्वात उंच बॉलर मोहम्मद मुदस्सरला तयार करण्यासाठी खास प्रयत्न करत आहे.

मोहम्मद मुदस्सर याची आर्थिक परिस्थिती फारच हालाकीची आहे. 'बॅटल ऑफ कलंदर्स'च्या फायनल मॅचमध्ये मोहम्मद मुदस्सर हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. मोहम्मद मुदस्सरची उंची सात फूट चार इंच इतकी आहे. या फास्टर बॉलरला लाहोर कलंदर्सने निवडत आपल्या टीममध्ये घेतलं आहे. मोहम्मद मुदस्सर हा सध्या लाहोर कलंदर्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये एक वर्षांची ट्रेनिंग घेत आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये मोहम्मद आपल्या बॉलिंगचा विशेष सराव करत आहे.

मोहम्मद मुदस्सर याच्या उंचीमुळे सोशल मीडियात तो चांगलाच हिट ठरत असल्याचं दिसत आहे. पाहूयात ट्विटर युजर्स काय म्हणतायत...

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफान फर्स्ट क्लास आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात उंच क्रिकेटर आहे. इरफानची उंची सात फूट एक इंच आहे. लाहोर कलंदर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्रेंचायजी नेहमीच चांगल्या क्रिकेटरला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यास तयार असतं आणि मोहम्मद मुदस्सर याच्याकडे एक अनोखं कौशल्य आहे. 

बास्केटबॉल (एनबीए) मध्ये आतापर्यंत सर्वात उंच प्लेअर मनुते बोल आणि गेओर्घे मुरेसन यांची ओळख आहे. या दोन्ही प्लेअर्सची उंची 7 फूट 7 इंच इतकी होती. क्रीडा इतिहासात या दोन्ही प्लेअर्सपेक्षा उंची प्लेअर नाहीये. क्रिकेटचं बोलायचं झालं तर सर्वात उंच क्रिकेटर मोहम्मद इरफान आहे ज्याची उंची सात फूट एक इंच आहे.

मोहम्मद मुदस्सरने सांगितले की, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळून नॅशनल टीममध्ये सहभागी होण्यास इच्छूक आहे. आपल्याला सर्वाधिक त्रास शूज शोधताना होतो. तसेच येत्या काळात इतर फास्ट बॉलर्स प्रमाणे आपल्याला फिटनेसचा त्रास होऊ नये अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी