277 धावा करत या फलंदाजाने क्रिकेट जगतात आणले वादळ, ठोकले 15 सिक्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2022 | 11:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

तामिळनाडूच्या या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरूणाचल प्रदेशाविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली. 

n jagdishan
277 धावा करत या फलंदाजाने क्रिकेट जगतात आणले वादळ 
थोडं पण कामाचं
  • जर जगदीशनने तिहेरी शतक पूर्ण केले असते तर वनडे क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो इतिहासातील पहिला फलंदाज ठरला असता.
  • फलंदाजाने 114 बॉलमध्ये 25 चौकार आणि 15 षटकार ठोकत प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी उद्ध्वस्त केली
  • तामिळनाडूच्या या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरूणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली

मुंबई: क्रिकेट(cricket) जगतात दर दिवसाला नवीन रेकॉर्ड(record) बनत असतात तसेच जुने रेकॉर्ड तुटत असतात. असाच एक रेकॉर्ड विजय हजारे ट्रॉफी(vijay hazare trophy) दरम्यान बनला आहे. तामिळनाडूचा क्रिकेटर एन जगदीशने(tamilnadu cricketer n jadishan) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शानदार 277 धावांची खेळी करत मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या फलंदाजाने 114 बॉलमध्ये 25 चौकार आणि 15 षटकार ठोकत प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी उद्ध्वस्त केली. तामिळनाडूच्या या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरूणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली. शतक पूर्ण करण्यासाठी जगदीशनने 77 बॉलचा सामना केला. यानंतर एक ऐतिहासिक खेळी करत इतिहास रचला. tamilnadu cricketer n jadishan hits 277 runs, make record 

अधिक वाचा - कधी आहे आहे दर्श अमावस्या 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा

याशिवाय जर जगदीशनने तिहेरी शतक पूर्ण केले असते तर वनडे क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो इतिहासातील पहिला फलंदाज ठरला असता. मात्र तो असे करू शकला नाही आणि 42व्या ओव्हरमध्ये बाद झाला. याशिवाय या 26 वर्षीय खेळाडूने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. जगदीशनने इंग्लंडच्या 22 वर्षीय एलिस्टर ब्राऊनचा रेकॉर्ड ही खेळी करताना तोडला. एलिस्टरने लिस्ट ए सामन्यात 268 धावांची खेळी केली होती. 

तामिळनाडूने या सामन्यात दोन बाद 506 धावा केल्या ज्या पुरुष लिस्ट एक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टीम स्कोर आहे. गेला रेकॉर्ड इंग्लंडच्या नावे होता. त्यांनी या वर्षाच्या सुरूवातीला नेदरलँड्सविरुद्ध चार बाद 498 धावा केल्या होत्या. भारतात लिस्ट एमध्ये गेला सर्वाधिक स्कोर मुंबईच्या नावे होता. त्यांनी 2021मध्ये जयपूरमध्ये पाँडिचेरीविरुद्ध चार बाद 457 धावा केल्या होत्या. 

जगदीशनने केवळ 114 बॉलमध्ये 200 धावा ठोकल्या. त्या दरम्यान लिस्ट एमध्ये सर्वात वेगवान दुहेरी शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. या फलंदाजाने सलग पाचवे लिस्ट एमधील शतक ठोकले आणि नवा रेकॉर्ड केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक व्यक्तिगत स्कोर पृथ्वी शॉने पाँडिचेरीविरुद्ध 227 धावा केल्या होता. जगदीशनने हा रेकॉर्डही मोडला. तामिळनाडूचा हा विकेटकीपर फलंदाजा भारताच्या वरिष्ठ वनडे स्पर्धेत दुहेरी शतक ठोकणारा सहावा फलंदाज ठरला आहे. 

अधिक वाचा - ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित

जगदीशनने बी साई सुदर्शनसोबत पहिल्या विकेटसाठी 416 धावांची भागीदारी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. सुदर्शनने 102 बॉलमध्ये 19 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 154 धावा केल्या. जगदीशनने शनिवारी सलग चौथे शतक ठोकताना लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक शतक बनवण्याच्या बाबतीत कुमार संगकारा, अल्विरो पीटरसन आणि देवदत्त पड्डिकल यांच्याशी बरोबरी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी