भारताविरुद्धच्या वन डे सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का

tamim iqbal ruled out of india vs bangladesh odi series, litton das to lead bangladesh in odi series against india : भारत आणि बांगलादेश यांच्यात बांगलादेशमध्ये रविवार 4 डिसेंबर 2022 पासून 3 वन डे मॅचची सीरिज सुरू होत आहे. या सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. 

tamim iqbal ruled out of india vs bangladesh odi series
भारताविरुद्धच्या वन डे सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारताविरुद्धच्या वन डे सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का
  • बांगलादेशचा कॅप्टन आणि स्टार बॅटर तमीम इकबाल दुखापतीमुळे खेळणार नाही
  • लिटन दास बांगलादेशच्या वन डे टीमचे नेतृत्व करणार

tamim iqbal ruled out of india vs bangladesh odi series, litton das to lead bangladesh in odi series against india : भारत आणि बांगलादेश यांच्यात बांगलादेशमध्ये रविवार 4 डिसेंबर 2022 पासून 3 वन डे मॅचची सीरिज सुरू होत आहे. या सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. 

बांगलादेशचा कॅप्टन आणि स्टार बॅटर तमीम इकबाल दुखापतीमुळे भारताविरुद्धची वन डे सीरिज खेळणार नाही. तो भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सहभागी होण्याची शक्यता पण अतिशय धूसर आहे. तमीम इकबालच्या गैरहजेरीत लिटन दास बांगलादेशच्या वन डे टीमचे नेतृत्व करणार आहे.

बांगलादेशचे नॅशनल फिजिओ इस्लाम खान यांनी तमीमच्या ग्रोइनमध्ये दुखापत झाल्याचे सांगितले. एमआरआय केल्यावर दुखापतीचे नेमके स्वरुप लक्षात आल्याचे ते म्हणाले. किमान 2 आठवडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तमीम इकबाल रिहॅब सेंटरमध्ये जाणार आहे. याच कारणामुळे तमीम वन डे सीरिज खेळणार नाही आणि टेस्ट सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता धूसर आहे. 

Ruturaj Gaikwad: या क्रिकेरटरमुळे ऋतुराजने 1 ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स...खोलले गुपित

Mohammed Kaif:हिऱ्याच्या शोधात आम्ही सोने गमावले, कैफची टीका

भारताचा बांगलादेश दौरा

ढाक्यातील सर्व मॅच शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर तर चटोग्राममधील सर्व मॅच जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार

  1. रविवार 4 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश पहिली वन डे, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  2. बुधवार 7 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश दुसरी वन डे, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  3. शनिवार 10 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश तिसरी वन डे, चटोग्राम. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  4. बुधवार 14 डिसेंबर 2022 ते रविवार 18 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश पहिली टेस्ट, चटोग्राम. थेट प्रक्षेपण सकाळी 9 पासून
  5. गुरुवार 22 डिसेंबर 2022 ते सोमवार 26 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश दुसरी टेस्ट, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 9 पासून

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी