अवघ्या 15 रन्सवर टीम ऑलआऊट, बॅट्समनची इतकी वाईट स्थिती कधी तुम्ही पाहिली नसेल...

Cricket News: क्रिकेटमध्ये कधी कोणता बॅट्समन चांगली इनिंग खेळेल आणि कोणता बॉलर चांगली बॉलिंग करेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. असाच काहीसा प्रकार एका मॅचमध्ये पहायला मिळाला. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • संपूर्ण टीम अवघ्या 15 रन्सवर माघारी परतली
  • एकाही बॅट्समनला 4 पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत

Cricket team all out on 15 runs: क्रिकेटच्या टी-20 फॉरमॅटमध्ये अनेक रेकॉर्ड्स होताना आपण पाहतो. या फॉरमॅटमध्ये असे काही रेकॉर्ड्स झाले आहेत ज्यांचा कदाचित कोणी विचारही केला नसेल. तर अशाही काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे काही प्लेअर्सने आपला सर्वात वाईट परफॉर्मन्स दाखवला आहे. आता असाच एक परफॉर्मन्स समोर आला आहे जेथे संपूर्ण टीम अवघ्या 15 रन्सवर आऊट झाली. (Team all out on 15 runs in bbl Sydney thunders vs Adelaide striker)

BBL म्हणजेच बिग बॅग लीगमध्ये एडिलेड स्ट्रायकर आणि सिडनी थंडर्स यांच्यात मॅच झाली. ही मॅच एडिलेड स्ट्रायकरच्या टीमसाठी ऐतिहासिक ठरली तर दुसरीकडे सिडनी थंडर्ससाठी लाजिरवाणा दिवस ठरला. कारण या मॅचमध्ये सिडनी थंडर्सची संपूर्ण टीम 15 रन्सवर माघारी परतली. एडिलेड स्ट्रायकरच्या टीमसमोर एकाही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही.

हे पण वाचा : Yearly Horoscope 2023: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल नवे वर्ष, वाचा

एडिलेड स्ट्रायकरच्या टीमने सर्वप्रथम बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत 139 रन्स केल्या. एडिलेड स्ट्रायकरच्या टीमकडून क्रिस लिन याने 36 रन्सची इनिंग खेळली तर कॉलिन डी ग्रँडहोम याने 33 रन्सची इनिंग खेळली. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिडनी थंडर्सच्या बॅट्समनला एडिलेड स्ट्रायकरच्या बॉलर्सने एक-एक करुन माघारी धाडलं.

हे पण वाचा : चेहरा उजळेल फटाफट, फक्त हे काम करा झटापट

सिडनी थंडर्सच्या टीमने दोन रन्स केल्या तेव्हा टीमने आपला पहिला विकेट गमावला. त्यानंतर एक-एक करुन बॅट्समन आऊट होत गेले. टीमचा स्कोअर 9 रन्स होता तेव्हा अर्धी टीम माघारी परतली होती. टीमचे एलेक्स हेल्स आणि मॅथ्यू गिलक्स या दोन्ही ओपनर बॅट्समनला आपलं खातंही खोलता आलं नाही.

हे पण वाचा : या कारणांमुळे तुमचे वजन कमी होत नाही

एडिलेड स्ट्रायकरच्या टीमकडून हेनरी थॉर्टन याने 2.5 ओव्हर्समध्ये तीन रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. एगर याने दोन ओव्हर्समध्ये सहा रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. तर मॅथ्यू शॉर्ट याने एक विकेट घेतली. सिडनी थंडर्सच्या टीमकडून एकाही बॅट्समनला दुहेरी स्कोअर करता आला नाही. सिडनी थंडर्सच्या टीमकडून दहाव्या नंबरवर आलेल्या ब्रेंडन डोगेट याने सर्वाधिक म्हणजेच 3 रन्स केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी