IND vs WI: दुखापतग्रस्त झाल्याने या खेळाडूने वाढवल्या टीम इंडियाच्या अडचणी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 22, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्याआधी स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत आणि तो विंडीजविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर होऊ शकतो. 

team india
IND vs WI: विंडीज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ 
थोडं पण कामाचं
  • भारताचा सुपरस्टार ऑलराऊंडर आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे.
  • यात भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
  • दुखापतग्रस्त झाल्याने रवींद्र जडेजाने संघाच्या इनडोअर सरावालाही उपस्थिती लावली नाही.

मुंबई: भारतीय संघाला(india vs west indies) वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील(one day series) पहिला सामना आज २२ जुलैला खेळवला जात आहे. यासाठी टीम इंडियाने पूर्ण तयारी केली आहे मात्र एका स्टार प्लेयर दुखापतग्रस्त(player injured) झाल्याने भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. हा खेळाडू वेस्ट इंडिज मालिकेतून(west indies series) बाहेर होऊ शकते. कर्णधार शिखर धवनसमोर(captain shikhar dhawan) सगळ्यात मोठे आव्हान आहे की या खेळाडूची जागा कोण घेणार. (Team india all rounder ravindra jadeja injuerd before west indies series)

अधिक वाचा - अंगभर टॅटू असल्याने मिळेना नोकरी

दुखापतग्रस्त झाला हा खेळाडू

भारताचा सुपरस्टार ऑलराऊंडर आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे. यात भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. दुखापतग्रस्त झाल्याने रवींद्र जडेजाने संघाच्या इनडोअर सरावालाही उपस्थिती लावली नाही. जडेजाची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत अद्याप समजलेले नाही. मात्र त्याने सराव सत्रात सहभागी न घेतल्याने त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि बीसीसीआयची मेडिकल टीम याचा तपास करत आहे. 

वनडे मालिकेतून होऊ शकतो बाहेर

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कप लक्षात घेता रवींद्र जडेजाला वनडे मालिकेत आराम दिला जाऊ शकतो. ज्यामुळे त्याची दुखापत अधिक वाढणार नाही. जडेजा सध्या जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे भारताला सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. जर जडेजा ठीक झाला तर तो पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळू शकतो. 

या खेळाडूला मिळू शकते संधी

पहिल्या वनडे सामन्यात रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघ गेल्या १६ वर्षात वेस्ट इंडिजच्या जमिनीवर एकही वनडे मालिका हरलेला नाही. टीम इंडियाकडे अनेक मॅच विनर्स प्लेयर्स आहेत जे मालिका जिंकून देऊ शकतात. 

अधिक वाचा - Sale...जवळपास अर्ध्या किंमतीला मिळणार स्मार्टफोन;जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा वनडे संघ

शिखर धवन(कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन(विकेटकीपर), संजू सॅमसन(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी