Team India for WI T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, विराटला आराम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 14, 2022 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian squad selection for T20I series against West Indies: बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 

team india
वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा 
थोडं पण कामाचं
  • भारताचा वेस्ट इंडिज दौरा २०२२
  • वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
  • बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने घेतला निर्णय

मुंबई: आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या द्वीपक्षीय टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीला या मालिकेसाठी आराम देण्यात तर कुलदीप यादव आणि लोकेश राहुलने पुनरागमन केले आहे. दरम्यान दोन्ही खेळाडूंचे खेळणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून आहे.Team india announce for west indies tour, virat will get rest

अधिक वाचा -संधी चुकवू नका, भारतात बघा Supermoon चा अद्भूत नजारा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ही आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), ईयान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, एस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविंद्रचंद्र अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. लोकेश राहुल आणि कुलदीप यादवला सामील करणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून आहे. 

टी-२० मालिकेचे वेळापत्रक(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू)

पहिला टी-२० सामना - २९ जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-२० सामना - १ ऑगस्ट, सेंट किट्स अँड नेव्हिस
तिसरा टी-२० सामना - २ ऑगस्ट , सेंट किट्स अँड नेव्हिस
चौथा टी-२० सामना - ६ ऑगस्ट, अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये
पाचवा टी-२० सामना - ७ ऑगस्ट, अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये

भारत-वेस्टइंडीज वनडे सीरीज कार्यक्रम

पहिली वनडे: 22 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

दुसरी वनडे: 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

तिसरी वनडे: 27 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

अधिक वाचा - या दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी