मुंबई: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे जिथे रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज आहे. तिथे बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ज्या टीमची घोषणा केली आहे त्याचे नेतृत्व शिखर धवनच्या हातात सोपवण्यात आले आहे. Team india announced for west indies tour
अधिक वाचा - दोन मंत्र्यांची विकेट पडणार, श्रीकांत शिंदेंची लागणार वर्णी?
बीसीसीआयच्या निवड समितीने बुधवारी बैठकनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या मालिकेत शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार आहे. तर रवींद्र जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. शिखर धवनला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाच निवडण्यात आले नाही मात्र तो इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाचा भाग असणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.
अधिक वाचा - मोबाईलचा शोध लावणारा स्वतःच वापरत नाही फोन
भारत-वेस्टइंडीज वनडे सीरीज कार्यक्रम
पहिली वनडे: 22 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरी वनडे: 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
तिसरी वनडे: 27 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन