IND vs PAK Asia Cup 2022 : टीम इंडियाने घेतला पाकिस्तानचा बदला, विजयानंतर शरद पवारांचं अनोखं सेलिब्रेशन, सुप्रिया सुळेंनी शेअर केला VIDEO

भारताने (India) परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (Pakistan) दिमाखदार विजय (victory) मिळवला. भारताने आशिया चषक (Asia cup) स्पर्धेची सुरुवात शानदार केली आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत याच मैदानात टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तानने पराभव केला होता. त्या पराभवाची आज भारतीय संघाने सव्याज परतफेड केली.

Sharad Pawar's tremendous celebration on Team India's victory
Team India विजयावर शरद पवारांचं जबरदस्त सेलिब्रेशन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार
  • विजयानंतर शरद पवारांनीही सेलिब्रेशन केलं.

मुंबई: भारताने (India) परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (Pakistan) दिमाखदार विजय (victory) मिळवला. भारताने आशिया चषक (Asia cup) स्पर्धेची सुरुवात शानदार केली आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत याच मैदानात टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तानने पराभव केला होता. त्या पराभवाची आज भारतीय संघाने सव्याज परतफेड केली. या विजयाचा लाखो चाहत्यांनी आनंद साजरा केला. पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Modi) खेळाडूचं अभिनंदन केलं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष (President of NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या परिवारासह सामना जिंकल्यानंतर जल्लोष केला.  (Team India beat Pakistan, Sharad Pawar's unique celebration after victory, Supriya Sule shared VIDEO)

भारताने पहिलाच सामना तोही पाकिस्तानसोबतचा असलेला सामना जिंकत अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आनंद वााढवला. टीम इंडियाने हा सामना जिंकत आशिया चषकाची सुरुवात चांगली केली आहे. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. दरम्यान मैदानावरील प्रेक्षकांबरोबर घरोघरी जीव मुठीत घेऊन सामना बघणारे क्रिकेटप्रेमींनीही आपला आनंद साजरा केला. टीम इंडियाचा हा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही पाहत होते.  

भारताच्या या थरारक विजयानंतर शरद पवारांनीही सेलिब्रेशन केलं.  शरद पवारांनी या विजयावर दोन्ही हात करत जल्लोष केला. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शरद पवारांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकला आहे. आनंदी रविवार केल्याबद्दल टीम इंडियाचे धन्यवाद, असं कॅप्शन सुप्रिया सुळेंनी या व्हिडिओला दिलं आहे.

Read Also : आज आहे जयश्री गडकर यांची पुण्यतिथी, वाचा आजचे दिनविशेष

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 147 धावांवर संपवला. भुवनेश्वर कुमारने 4, हार्दिक पांड्याने 3, अर्शदीप सिंगने 2 तर आवेश खानने 1 विकेट घेतली. पाकिस्तानने दिलेल्या 148 आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. केएल राहुल पहिल्याच बॉलला बोल्ड झाला, यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 35 धावा करून विराट पॅव्हेलियनमध्ये परतला, यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने टीम इंडियाला जिंकवून दिलं. हार्दिकने 17 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले, तर जडेजा 29 बॉलमध्ये 35 रन करून आऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाझला 3 आणि नसीम शाहला 2 विकेट मिळाल्या.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी