IND vs SA: द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत या प्लेईंग ११सोबत उतरू शकते टीम इंडिया

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 21, 2021 | 16:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs south africa: द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या अंतिम ११मध्ये शार्दूल ठाकूर, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्यापैकी एकाच्या निवडीची शक्यता आहे. कोणत्याही खेळाडूला प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. 

team india
आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत प्लेईंग ११सोबत उतरणार इंडिया? 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघ गेल्या तीन दिवसांपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये सराव करत आहे
  • विराट कोहली(virat kohli) ऑलराऊंडर शार्दूल ठाकूरसह पाच वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवणार?
  • उसळणाऱ्या पिचवर अजिंक्य रहाणेच्या रुपात अतिरिक्त फलंदाजाला संधी दिली जाईल

मुंबई: द. आफ्रिकेविरुद्ध(india vs south africa) २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या(test series)सुरूवातीच्या सामन्यात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की कर्णधार विराट कोहली(virat kohli) ऑलराऊंडर शार्दूल ठाकूरसह पाच वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवणार की उसळणाऱ्या पिचवर अजिंक्य रहाणेच्या रुपात अतिरिक्त फलंदाजाला संधी दिली जाईल. फलंदाजाच्या पर्यायासाठी हनुमा विहारीही मजबूत दावेदार असेल. त्याने नुकताच भारताच्या ए टीमसोबत द. आफ्रिकेचा नुकताच दौरा केला आहे. Team india can be played with this playing 11 against south africa

भारतीय संघ गेल्या तीन दिवसांपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये सराव करत आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या संघाला मैदााच्या मुख्य स्टेडियमवर सराव करण्याची संधी दिली आहे. एसईएनए देशांमध्ये (द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) मध्ये कसोटी सामन्याआधी मुख्य विकेटवर सराव करण्याची संधी फार मुश्किलीने मिळते. 

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत मुख्य कोच राहुल द्रविडने मुख्य पिचवर सराव करण्याच्या फायद्याबाबत सांगितले होते. तर मध्यमक्रमाचा फलंदाज श्रेयस अय्यरने गवताळ पिचवर सराव करण्याबाबत बोलला होता. रणनीतीच्या प्रमाणे कोहलीला आक्रमक कर्णधार म्हणून ओळखले जाते आणि तो पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्यास पसंती देईल. ऑलराऊंडर रवींद्र जडेजा सातव्य क्रमांकावर फलंदाजीचा चांगला पर्याय आहे. मात्र त्याच्या गैरहजेरीत शार्दूल ही जबाबदारी उचलू शकतो. 

निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसादने सांगितले, मला वाटते की जर टीम पाच गोलंदाजांसह उतरेल तर शार्दूल चांगला पर्याय आहे. कारण तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीचा पर्यायही देतो आणि आमच्याकडे रवीचंद्रन अश्विनही आहे. संघात चार गोलंदाजांची जागा ठरलेली आहे ज्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अश्विन आणि मोहम्मद सिराजचे नाव आहे. मला नाही वाटत की सध्याची लय पाहता संघात इशांतला सिराजच्या जागी संधी दिली जाईल. 

भारताचे संभाव्य प्लेईंग ११

(फिटनेसच्या आधारावर) : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मुहम्मद सिराज

११वा खेळाडू : शार्दूल ठाकूर / अजिंक्य रहाणे / हनुमा विहारी (तीन पैकी एक)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी