T20 World Cup: इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा झटका?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2022 | 12:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्ध गुरूवारी 10 नोव्हेंबरला खेळवल्या जाणाऱ्या सेमीफायनल सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. 

ro
इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलआधी टीम इंडियाला जबरदस्त झटका? 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्याच्या आधी नेट्समध्ये बॅटिंगचा सराव करताना मनगटाला दुखापत झाली.
  • कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली.
  • दरम्यान, काही वेळाने त्याने पुन्हा सराव सुरू केला.

मुंबई: इंग्लंडविरुद्ध(england) गुरूवारी 10 नोव्हेंबरला खेळवल्या जाणाऱ्या सेमीफायनलआधी(semifinal) टीम इंडियाला(team india) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा(team india captain rohit sharma) दुखापतग्रस्त झाला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या मनगटाला दुखापत(wrist injury) झाली आहे. Team india captain rohit sharma injured during practice session

अधिक वाचा - किस केल्यानं कमी होतो लठ्ठपणा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे

टीम इंडियाला मोठा झटका

खरंतर, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्याच्या आधी नेट्समध्ये बॅटिंगचा सराव करताना मनगटाला दुखापत झाली. कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. दरम्यान, काही वेळाने त्याने पुन्हा सराव सुरू केला. कर्णधार रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबतचे मोठे अपडेट समोर आले आहे. 

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये रोहित खेळणार की नाही?

रोहित शर्माच्या दुखापतीने इंग्लंडविरुद्ध 10नोव्हेंबरमध्ये अॅडलेडमध्ये होणाऱ्या सेमीफायनल सामन्याआधी टीम इंडियाचे टेन्शन जरूर वाढवले आहे. रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करताना सिंपल ड्रिल करत होता आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट एस रघुचा सामना करत होता तेव्हा एका शॉर्ट पिच बॉल वेगाने उसळून त्याला उजव्या मनगटाला लागला. 

दुखापतीबाबत समोर आलेय नवे अपडेट

रोहित शर्मा पुल शॉट खेळताना चुकला आणि बॉल वेगाने त्याच्या हातावर लागला. त्याला बॉलमुळे त्रास झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने लगेचच सराव सोडला. रोहित सरावापासून दूर उभा होता तेव्हा त्रस्त दिसत होता. 

काही वेळाने सुरू केला सराव

आईस पॅक लावल्यानंतर आणि काही काळ विश्रांती घेतल्यानंतर रोहितने पुन्हा सराव केला मात्र थ्रोडाऊन स्पेशालिस्टला आदेश देण्यात आले की त्याने वेगाने बॉल फेकू नये आणि यातच भारताचा कर्णधाराने अधिक बचावात्मक शॉट खेळले. यामुळे मूव्हमेंट योग्य होतेय की नाही हे समजेल. 

अधिक वाचा - सतत चिंतातूर असण्यामागे असतात ‘ही’ कारणं

भारतीय मेडिकल टीमचे रोहितच्या दुखापतीवर लक्ष

भारतीय मेडिकल टीम सराव सेशननंतर या दुखापतीवर लक्ष देणार आहे. भारताला गुरूवारी दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना बुधवारी सिडनीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी