Team india coach: भारताच्या प्रशिक्षकांची सॅलरी भारताच्या कॅप्टनपेक्षाही जास्त

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 20, 2021 | 17:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची सॅलरी अनेक लोकांना भुलवते. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने राहुल द्रविडला टीमचा कोच बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

rahul dravid
भारताच्या प्रशिक्षकांची सॅलरी भारताच्या कॅप्टनपेक्षाही जास्त 
थोडं पण कामाचं
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार कोच रवी शास्त्रीला ९.५ ते १० कोटी रूपये पगार मिळतो.
  • जगातील एखाद्या क्रिकेट प्रशिक्षकाला मिळणारी सगळ्यात जास्त सॅलरी आहे
  • सेंट्रल कॉन्ट्रॅक्टअंतर्गत कर्णधार विराट कोहलीला ७ कोटी रूपये मिळतात.

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२१ संपताच भारताचे कोच रवी शास्त्री आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ यांचा कार्यकाळही संपेल. बीसीसीआय आता नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यासाठी त्यांनी अर्ज मागवले आहेत. भारतीय संघाचा कोच होण्यासाठी अनेक दिग्गजांनी आपली इच्छा व्यक्त केली. खरंतर, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची सॅलरी अनेक लोकांना भुलवते. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने राहुल द्रविडला टीमचा कोच बनवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकाला दरवर्षी १० कोटी रूपयांचा पगार मिळतो. 

भारताच्या कोचची सॅलरी कर्णधारापेक्षा जास्त

मीडिया रिपोर्ट्सनुसार कोच रवी शास्त्रीला ९.५ ते १० कोटी रूपये पगार मिळतो. जगातील एखाद्या क्रिकेट प्रशिक्षकाला मिळणारी सगळ्यात जास्त सॅलरी आहे. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टअंतर्गत कर्णधार विराट कोहलीला ७ कोटी रूपये मिळतात. म्हणजे कोचची सॅलरी कर्णधारापेक्षा जास्त आहे. 

शास्त्रींच्या कार्यकाळात टीम इंडियाने परदेशात झेंडा रोवला. टीमने ऑस्ट्रेलिया २ वेळा कसोटी मालिका जिंकली. याआधी कोणत्याही संघाला ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका जिंकलेली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये इंग्लंडविरुद्ध मालिकेत २-१ आघाडी घेतली होती. याआधी संघाला वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. शास्त्रीच्या कार्यकाळाता संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. या कारणावरून त्यांच्यावर सवाल उपस्थित केले जात आहेत. 

२५ वर्षात बदलली परिस्थिती

१९९६-९७मध्ये १९८३ वर्ल्डकप विजेता संघात सामील असलेले मदन लाल टीम इंडियाचे कोच होते. त्यांना दर महिन्याला ५ लाख रूपये दिले जात होते. यानंतर १९९९-२०००मध्ये माजी कर्णधार कपिल देव संघाचे कोच होते. त्याने प्रत्येक सामन्यासाठी ४ लाख आणि अतिरिक्त बोनस दिले जाते होते. रवी शास्त्री २०१७मध्ये जेव्हा करारबद्ध केले होते तेव्हा त्यांना वर्षाला ८ कोटी रूपये मिळत होते. २०१९मध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. 

२०१६-१७ दरम्यान माजी कर्णधार अनिल कुंबळे टीम इंडियाचे को होते त्यांना वर्षाला ६ कोटी रूपये मिळत होते. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर आणि कोहलीशी वाद झाल्यानंतर ते हटले होते. परदेशी कोचबाबत बोलायचे झाल्यास जॉन राईट २००० ते २००५ पर्यंत टीम इंडियाचे कोच होते. त्यांना दरवर्षी साधारण १ कोटी रूपये मिळत होते. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ग्रेग चॅपेल २००५ ते २००७ पर्यंत कोच होते. त्यांना वर्षाला १.२५ कोटी रूपये दिले जात होते. तर दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कस्टर्न २००८ ते २०११ पर्यंत टीमचे कोच होते. त्यांना वर्षाला २.५ कोटी रूपये वर्षाला दिले जात होते. याशिवाय झिम्बाब्वेचे डंकन फ्लेचरही २०११ ते २०१५ पर्यंत टीमचे कोच होते. त्यांना वर्षाला ४.२ कोटी रूपये मिळत होते. 

 
  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी