कोरोनातून बरी झाली टीम इंडियाची ही खेळाडू, कॉमनवेल्थमध्ये खेळणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 01, 2022 | 13:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pooja Vastrakar set to join team: भारतीय महिला क्रिकेट संघांची ऑलराऊंडर पूजा वस्त्राकर कोरोनातून पूर्णपणे बरी झाली आहे. कॉमनवेल्थ गेम्स २०२२साठी ती भारतीय संघाशी जोडली जाणार आहे. 

pooja vastrakar
commonwealth games:कोरोनातून बरी झाली टीम इंडियाची ही खेळाडू 
थोडं पण कामाचं
  • पूजा वस्त्राकर कोरोनातून बरी झाली आहे. 
  • पूजा वस्त्राकर भारतीय संघाशी जोडली जाणार आहे. 
  • भारत आपली शेवटची लीग बारबाडोसविरुद्ध खेळणार

बर्मिंगहम: भारताची ऑलराऊंडर क्रिकेटर पूजा वस्त्राकर(pooja vastrakar) कोरोनातून(corona) बरी झाली आहेआणि कॉमनवेल्सथ गेम्स(commonwealth games) खेळण्यासाठी महिला क्रिकेट संघामध्ये(womens cricket team) सहभागी होणार आहे. मेघनाने रविवारी खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. तर वस्त्राकर बारबाडोसविरुद्ध तीन ऑगस्टला खेळवणाऱ्या शेवटच्या लीग सामन्यात खेळणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या एका सूत्राने सांगितले, ती आज रात्री उशिरा पोहोचेल.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानला ८ विकेटनी हरवले. 

अधिक वाचा - टाटांची ही सर्वात स्वस्त कार लवकरच होणार लॉंच...

हरमनप्रीत कौरने तोडला धोनीचा मोठा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये पहिला विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी खास होता.तिने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा रेकॉर्ड तोडला. इतकंच नव्ह हरमनप्रीत कौर भारताची सगळ्यात यशस्वी टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारही बनली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२वा विजय बनवला. 

अधिक वाचा - सोन्याच्या भावातील तेजीला लगाम, चांदीही घसरली

हरमनप्रीत कौरने एमएस धोनीचा रेकॉर्ड तोडला आहे. २००७ टी-२० वर्ल्डकप विजेता कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ४१ टी-२० सामने जिंकले होते. या लिस्टमध्ये तिसऱ्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय प्रकारात ३० विजय मिळवले. हरमनप्रीत कौरला २०१८मध्ये टी-२० प्रकारात कर्णधार बनवण्यात आले होते. 

पाकिस्तानविरुद्ध भारताचा दणदणीत विजय

स्मृती मंधाना आणि स्नेह राणा यांच्या जबरदस्त खेळीमुळे कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या सामन्यात मंधानाने नाबाद ६३ धावा केल्या. तर स्नेह राणाने केवळ १५ धावांमध्ये पाकिस्तानचे दोन गडी बाद केले. पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना २० च्या ऐवजी १८ ओव्हर्सचा खेळवण्यात आला. टॉस जिंकत पाकिस्तानने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यांचा संपूर्ण संघ १८ ओव्हरमध्ये ९९ धावा करून बाद झाला. धावांचा पाठलाग करत असलेल्या भारताने स्मृती मंधानाच्या शानदार अर्धशती खेळीच्या जोरावर अवघ्या ११.४ ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठले. हा कॉमनवेल्थमधील भारताचा पहिला विजय आहे. याआधीच्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवास सामोरे जावे लागले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी