साउथहॅम्प्टन: प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा 50 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यासह भारतीय संघाने तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. साउथम्प्टनमध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 198/8 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ 19.3 षटकांत 148 धावांत गारद झाला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, त्याने 51 धावा केल्या आणि 4 बळी घेतले.
हार्दिक पांड्याने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आणि ते खूप खास ठरले. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक आणि चार विकेट घेणारा पंड्या हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याला पत्रकाराने एक प्रश्न विचारला, ज्याला भारतीय अष्टपैलू खेळाडूने अतिशय मजेशीर उत्तर दिले आणि ते चाहत्यांना खूप आवडले.
अधिक वाचा: IND vs ENG:अखेर इतिहास रचण्यापासून भारत राहिला दूर, हा खेळाडू बनला सगळ्यात मोठा शत्रू
हार्दिक पांड्याला विचारण्यात आले की, जर वरिष्ठ खेळाडू दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संघात सामील होत असतील तर प्लेइंग 11 मध्ये काही बदल होईल का? यावर भारताच्या स्टार अष्टपैलूने उत्तर दिले, 'सर, हे माहित नाही. हे व्यवस्थापनाचे काम आहे. मी फक्त भारतासाठी अष्टपैलू खेळाडूप्रमाणे खेळतो. ते मला जे सांगतात ते मी करतो आणि त्यात जास्त लक्ष घालत नाही.'
एजबॅस्टन कसोटी आणि पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त एका दिवसाचे अंतर होते, हे लक्षात घेऊन पहिल्या सामन्यात एकही कसोटी खेळाडूचा समावेश करण्यात आला नव्हता. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर दुसऱ्या T20I सामन्यासाठी भारतीय संघात सामील होतील. हे सर्वजण या जागेसाठी दावेदार आहेत आणि दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये काय बदल करेल हे पाहणे मनोरंजक असेल.
अधिक वाचा: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं?, WTC फाइनलच्या रेसमधून जवळजवळ बाहेर
झहीर खान म्हणतो, संघात जास्त बदलाची गरज नाही!
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या मते दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात जास्त बदलाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे पहिल्या सामन्यात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भले या सामन्यातून पंत, कोहली, बुमराह आणि जडेजासारखे खेळाडू पुनरागमन करत असतील पण झहीर खानच्या मते कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग ११मध्ये जास्त बदल करणार नाही.