मुंबई: भारत आणि इंग्लंड(india vs england) यांच्यातील एजबेस्टन येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात(test match) भारताची चौथ्या दिवसाची कामगिरी अतिशय खराब राहिली. दुसऱ्या डावात भारताच्या भीती आणि बचावात्मक धोरणामुळे इंग्लंडला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेणारा भारत दुसऱ्या डावात केवळ २४५ धावांवर आटोपला. Team india former head coach ravi shastri take a dig on indian team
अधिक वाचा - CCTV: प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञांची हॉटेलमध्ये घुसून हत्या
पाचव्या कसोटीच्या कमेंट्रीदरम्यान शास्त्रींनी सांगितले. मला वाटते की हे निराशाजनक होते. कारण ते आपल्या फलंदाजीने इंग्लंडला सामन्यातून बाहेर फेकू शकले असते. त्यांना दोन सत्रात गोलंदाजी करणे गरजेचे होते आणि मला वाटते त्यांनी बचावात्मक धोरण स्वीकारले होते. ते आज घाबरलेले होते. विशेषकरून लंच नंतर. विकेट गमावल्यानंतरही जोखीम पत्करू शकत होते. त्यावेळेस धावा अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. मला वाटते की ते खूप बचावात्मक झाले. त्यांनी खूप लवकर विकेट गमावल्या आणि इंग्लंडला फलंदाजीसाठी पुरेसा वेळ दिला.
शास्त्री २०२१मध्ये भारतीय संघाचे मुख्य कोच होते तेव्हा भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र भारतीय संघात कोरोनाचे अनेक केसेसे आल्याने दौरा रद्द करण्यात आला. इंग्लंडा माजी कर्णधार केवीन पीटरसननेही भारताचा कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितले की फिल्डर्सना बचावात्मक पद्धतीने सजवून फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करणे सोपे असते.
जॉनी बेअरस्ट्रॉने केवळ नाबाद ११४ धावाच केल्या नाहीतर जर जो रूटसोबत मिळबून २६९ धावांची भागीदारी केली. जॉनी बेअरस्ट्रॉ आणि जो रूटने मिळून टीम इंडियाला या सामन्यातून बाहेर ढकलले. टीम इंडियाच्या या परिस्थितीला हनुमा विहारीला जबाबदार ठरवले जात आहे.
अधिक वाचा - गणेशोत्सवासंदर्भात मुंबई महापालिकेचा सर्वात मोठा निर्णय
या कसोटी सामन्यातील पराभवामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. गेल्या वर्षी ही मालिका इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली होती.