मुंबई: टीम इंडियाला(team india) असा एक खेळाडू सापडला आहे जो संघातील युवराज सिंहची(yuvraj singh) कमतरता पूर्ण करेल. आणि जो ४थ्या स्थानावर फलंदाजीसाठी मोठा दावेदार आहे. हा खेळाडू आपल्या फलंदाजीने जबरदस्त धमाल करतो. हा खेळाडू जेव्हा पिचवर पाऊल ठेवतो तेव्हा आपल्या तुफानी गोलंदाजीने टीम इंडियाला हरलेला डाव जिंकून देतो. या खेळाडूच्या रूपात टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावरील फलंदाज(batsman) सापडला आहे. Team india found next yuvraj singh
अधिक वाचा - शनिदेव उघडणार 'या' राशींच्या नशिबाचे दार
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला ९ जूनपासून सुरूवात होत आहे. या टी-२० मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजासारखे मोठे खेळाडू नाहीत. अशातच नेतृत्व लोकेश राहुलकडे देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिकेत टीम इंडियाचा धोकादायक ऑलराऊंडर हार्दिकपांड्याला मोठी जबाबदारी मिळू शकते. हार्दिक पांड्याला चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरवले जाऊ शकते.
नुकत्यात संपलेल्या आयपीएलच्या हंगामात हार्दिक पांड्या आपल्या संघात गुजरात टायटन्समध्ये ३ नंबर अथवा ४ नंबरवर फलंदाजी करत होता. हार्दिक पां्याने आयपीएल २०२२च्या हंगामात १५ सामन्यांत ४८७ धावा केल्या. याआधी हार्दिक पांड्या टीम इंडिामध्ये ६ अथवा ७व्या स्थानावर फलंदाजी करत होता. मात्र आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्याने आपला अंदाज बदलला.
गुजरात टायटन्ससाठी ३ अथवा ४ नंबरवर फलंदाजी करत हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. अशातच ऋषभ पंतसारख्या विकेटकीपर फलंदाजाचे डिमोशन होऊ शकते आणि त्याला ५व्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकला ६ अथवा ७व्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. आयपीएल २०२२मध्ये दिनेश कार्तिक शानदार फॉर्ममध्ये आहे. दिनेश कार्तिक फिनिशरची भूमिका साकारण्यास तयार आहे.
अधिक वाचा - हॉटेल रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर लावणे बेकायदा
लोकेश राहुल (कर्णधार), रूतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप कप्तान, विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह और उमरान मलिक.