Team India:टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच! समोर आली ही मोठी बातमी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 04, 2022 | 17:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs England: टीम इंडिया ७ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या हायप्रोफाईल मालिकेच्या आधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

team india
टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच! समोर आली ही मोठी बातमी 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाला राहुल द्रविडनंतर(rahul dravid) आणखी एक नवा हेड कोच मिळाला आहे.
  • हा नवा हेड कोच इंग्लंडविरुद्ध ७ जुलैला साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला कोचिंग देईल.
  • इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात बर्मिंगहॅम कसोटी ५ जुलैला संपत आहे.

मुंबई: टीम इंडिया(team india) ७ जुलैपासून इंग्लंडविरुदध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळ आहे. या हायप्रोफाईल मालिकेच्या आधी  भारतीय क्रिकेट संघासाठी(indian cricket team) एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, टीम इंडियाला राहुल द्रविडनंतर(rahul dravid) आणखी एक नवा हेड कोच मिळाला आहे. हा नवा हेड कोच इंग्लंडविरुद्ध ७ जुलैला साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला कोचिंग देईल. इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात बर्मिंगहॅम कसोटी ५ जुलैला संपत आहे. यानंतर दोनच दिवसांनी दोन्ही देशांदरम्यान साऊथम्पटनमध्ये पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. या टी-२० सामन्यांत विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंतसारखे स्टार क्रिकेटर नाही खेळणार. नियमित हेड कोच राहुल द्रविडही या सामन्याचा भाग असणार नाही. Team india get new head coach?

अधिक वाचा - रक्तातील साखर अचानक वाढल्यावर करा हे उपाय

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच

बीसीसीआयने मोठा निर्णय घेताना भारताची माजी दिग्गज क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणला इंग्लंडविरुद्ध ७ जुलैला साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी टीम इंडियाचा हेड कोटट बनवले आहे. याआधी व्हीव्हीएस लक्ष्मणला आयर्लंड दौऱ्यावरही मुख्य कोच बनवण्यात आले होते. 

समोर आली ही मोठी बातमी

याशिवाय टीम इंडियासाठी आणखी एक खुशखबर आली आहे की नियमित कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध ७ जुलैला होणाऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल. 

भारत वि इंग्लंड टी-२० वेळापत्रक

7 जुलै: पहला टी20 सामना (द रोज बाउल, साउथेम्प्टन)

9 जुलै: दूसरा टी20 सामना (एजबेस्टन, बर्मिंघम)

10 जुलै: तीसरा टी20सामना (ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम)

भारत वि इंग्लंड वनडे मालिका वेळापत्रक

12 जुलै: पहिला वनडे सामना (केनिंगटन ओवल, लंदन)

14 जुलै: दूसरा वनडे सामना (लॉर्ड्स, लंदन)

17 जुलै: तीसरा वनडे सामना (ओल्ड ट्रॅफर्ड, मँनचेस्टर)

पहिल्या टी-२० साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

अधिक वाचा - जान्हवी-न्यासा एकत्र लंच डेटवर

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जे बुमराह , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी