मुंबई: टीम इंडियाने द. आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी(india vs south africa test series) संघाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट 'Omicron' मुळे पहिली कसोटी १७ डिसेंबरऐवजी २६ डिसेंबरला सुरू होणार आहे. हा सामना सेंच्युरियनच्या मैदानावर रंगणार आहे. सातत्याने क्रिकेटचा परिणाम खेळाडूंवर आता स्पष्ट दिसू लागला आहे टी-२० वर्ल्डकपनंतर(t-20 world cup) टीम इंडियामध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंची(injured player) संख्या सातत्याने वाढत आहे. टीम सिलेक्शन मीटिंगआधी ४ खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचे समोर आले होते. Team India head coach Rahul Dravid back up plan for test series against south africa
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोीत रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. शुभमन गिल सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना आणि अक्षर पटेल मुंबई कसोटीनंतर दुखापतग्रस्त झाला. या सर्व खेळाडूंमध्ये केवळ इशांत शर्माला द. आफ्रिका दौऱ्यासाठी निवडले आहे. बाकी तीन खेळाडूंना दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर रहावे लागेल.
टीम इंडियाचा वर्कलोड आणि खेळाडूंच्या दुखापती लक्षात घेता कसोटी संघातही एक बॅकअप प्लान तयाक आहे. सिलेक्शन कमिटीने ४ बॅकअप खेळाडूंसाठी या दौऱ्यात निवडले आहे. दीपक चाहर, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि अर्जन नगवासवालाला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'Omicron' मुळे दिण आफ्रिकेत क्वारंटाईनचे नियम कडक झाले आहेत. ज्यामुळे टीम मॅनेजमेंट मालिकेदरम्यान खेळाडूंच्या दुखापतींबाबत कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. दीपक चाहरशिवाय इतर ३खेळाडूही भारत ए संघासोबत द. आफ्रिकेत मालिका खेळत आहेत.
दीपक चाहर सातत्याने भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघासोबत आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये दीपकने शानदार कामगिरी केली. आता त्याला कसोटी संघात जागा मिळण्याची आशा आहे. तर दुसरीकडे नवदीप सैनीने भारतीय कसोटी संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण केले होते. सैनीला भारत ए संघासोबत द. आफ्रिका दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे. सैनीने आतापर्यंत भारताकडून दोन कसोटी सामने खेळले आहेत तर भारत ए संघासाठी ३ सामन्यांत त्याने ११ विकेट घेतल्यात.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिधिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शारदुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अर्जन नागवासवाला.