टीम इंडियाच्या पराभवानंतर निराश तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 11, 2019 | 09:21 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Sachin Tendulkar on India vs New Zealand Semi Final: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर आपला राग व्यक्त केला.

sachin tendulkar
सचिन तेंडुलकर 

थोडं पण कामाचं

  • न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पराभव
  • भारताचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगले
  • सचिन तेंडुलकरची नाराजी

मँचेस्टर : भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांचे कौतुक केले मात्र त्याचबरोबर तो म्हणालाा भारतीय फलंदाजी केवळ पहिल्या फळीतील फलंदाजांवर अवलंबून राहू शकत नाही. निराश झालेला तेंडुलकर म्हणाला, भारतीय फलंदाजांनी २४० धावांचे आव्हान हे फार मोठे बनवले. न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांच्या पराभवामुळे भारताचे वर्ल्डकपमधील प्रवासाचे स्वप्न भंगले.

सचिन म्हणाला, मी निराश आहे कारण आपल्यासाठी २४० धावांचे आव्हान तितकेसे काही मोठे नव्हते. ही मोठी धावसंख्या नव्हती. न्यूझीलंडने सुरूवातीलाच तीन विकेट घेत सुरूवात चांगली केली. सचिन इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, मला वाटते आपल्याला चांगली सुरूवात करण्यासाठी नेहमीच रोहित शर्मा अथवा ठोस आधार तयार करण्यासाठी विराट कोहलीवर अवलंबून राहिले नाही पाहिजे. इतर खेळाडूंनीही फलंदाजीची जबाबदारी घ्यायला हवी. 

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला ८ बाद २३९ धावांवर रोखले. यानंतर प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाला केवळ ४९.३ ओव्हरमध्ये २२१ धावा करता आल्या. भारतीय संघ एकावेळी ६ बाद ९२ अशा अवस्थेत होता. त्यावेळी धोनी(५०) आणि जडेजा(७७) ने संयमी खेळी करताना ११६ धावांची भागीदारी केली. तेंडुलकर म्हणाला, हे योग्य नव्हे की दरवेळी धोनीनेच सामना का संपवावा. तो नेहमी असं करत आला आहे. 

हरभजन आणि रैनाचेही ट्वीट

भारताचा माजी स्पिनर हरभजन सिंगने ट्विटरवर लिहिले, दिल टूट गया, न्यूझीलंडला शुभेच्छा. चांगली कामगिरी केली जडेजा. सुरेश रैनाच्या मते वर्ल्डकपमधून टीम इंडिया जरी बाद झाली असली तरी त्यांनी आपल्या कामगिरीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. रैनाने ट्विट केले, भाग्याची साथ लाभली नाही. चांगले खेळले. स्पर्धेत आपल्या कामगिरीने मने जिंकली. न्यूझीलंडला शुभेच्छा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
टीम इंडियाच्या पराभवानंतर निराश तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना Description: Sachin Tendulkar on India vs New Zealand Semi Final: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर आपला राग व्यक्त केला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola