IND vs AUS: एका वर्षात टीम इंडियाला डबल झटका, पहिल्या टी-२०मध्ये झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 22, 2022 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२०मध्ये मोठा स्कोर उभा केला असतानाही पराभवाचा सामना करावा लागला. भारताने या पराभवासह एक लाजिरवाणा रेकॉर्डही आपल्या नावे केला. 

team india
IND vs AUS: एका वर्षात भारताला डबल झटका 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
  • भारताने गमावला पहिला टी-२० सामना
  • ऑस्ट्रेलियाची १-० अशी आघाडी

मुंबई: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात मंगळवारी मोहाली येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात(t-20 match) फलंदाजांची कामगिरी जबरदस्त राहिली. भारताने टॉस गमावल्यानंतर हार्दिक पांड्या(hardik pandya)(३० बॉलमध्ये नाबाद ७१) आणि केएल राहुल(kl rahul) यांच्या शानदार खेळींच्या जोरावर ६ बाद २०८ असा स्कोर केला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघावर या आव्हानाचा दबाव अजिबात दिसला नाही  आणि पाहुण्या संघाने भारतीय गोलंदाजाना धू धू धुतले. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट गमावत आणि चार बॉल राखत हा सामना जिंकला. कॅमेरून ग्रीन आणि मॅथ्यू वेड यांनी धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. Team india makes bad record in t-20 match against australia

अधिक वाचा - फिट असूनही सेलेब्रिटींना का येतो हार्ट अटॅक?

एकाच वर्षात भारताला डबल झटका

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर एक लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. खरंतर, टीम इंडियासोबत हे दुसऱ्यांदा घडले आहे की २०० पेक्षा जास्त धावा करूनही पराभव सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाआधी भारताला या वर्षी जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेने दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये ७ विकेटनी हरवले होते.

भारताने तेव्हा ४ विकेट गमावत २११ धावा केल्या होत्या. भारत असा दुसरा संघ आहे ज्याने एकाच वर्षात दोन वेळा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये घरच्या मैदानावर २०० पेक्षा जास्त धावांचा बचाव करण्यास असमर्थ ठरला. टीम इंडियाशिवाय दक्षिण आफ्रिकेला २०१६मध्ये आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव सहन करावा लागला होता. 

रोहितने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोहालीतील पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडले. सामन्यानंतर तो म्हणाला की, मला नाही वाटत की आम्ही चांगली गोलंदाजी केली. २०० धाव बचावासाठी चांगला स्कोर आहे. मात्र आम्ही मैदानात मिळालेल्या संधीचा फायदा उचलू शकलो नाही.

अधिक वाचा - VIDEO: मोहन भागवत मशिदीत पोहोचले आणि बैठकही घेतली

रोहित पुढे म्हणाला, मला वाटते की आम्ही चांगली फलंदाजी केली. दरम्यान, आम्ही कुठे चुकलो आणि पुढील सामन्यात आम्ही काय चांगले करू शकतो यावर नजर टाकणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना आता शुक्रवारी २३ सप्टेंबरला नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी