टीम इंडियाचा सदस्य कोविड पॉझिटिव्ह, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही: रिपोर्ट

India's tour of Australia: टीम इंडियाच्या थ्रो डाऊन स्पेशालिस्ट डी राघवेंद्र याला कोरोनाची लागण झाल्याने तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नसल्याचे समजते आहे. 

india_test_team
टीम इंडियाचा सदस्य कोविड पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२० संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
  • थेट यूएईवरुनच भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल
  • भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याला कोरोनाची लागण 

मुंबई: भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सुरू होणार आहे. परंतु त्याआधी त्यांची चिंता वाढली आहे. कारण टीम इंडियाचा थ्रो डाऊन एक्सपर्ट डी राघवेंद्र याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाणार नसल्याचं समजतं आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यूएईमध्ये जाणाऱ्या भारतीय टीमची कोविड-१९ चाचणी सुरू केली आहे. आयपीएल २०२० नंतर भारतीय संघ यूएईहून थेट  ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. आयपीएलमुळे बहुतेक खेळाडू हे यूएईमध्ये आहेत तर सपोर्ट स्टाफ आणि इतर खेळाडू देखील यूएईसाठी रवाना झाले आहेत. जे आता भारतीय संघाचा भाग आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने काही सपोर्ट स्टाफ आणि भारतीय खेळाडूंची कोविड-१९ चाचणी केली. आणि त्यानंतर त्यांना यूएईला पाठविण्यात आले. दरम्यान, या चाचणीमध्ये राघवेंद्रचा निकाल हा पॉझिटिव्ह होता. त्यामुळे या थ्रो डाउन तज्ज्ञाला क्वॉरंटाइन करण्यात आल्याने त्याला यूएईमध्ये पाठविण्यात आलेले नाही. तसं पाहिल्यास भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला जाण्यास वेळ आहे. पण कठोर क्वॉरंटाइन नियमामुळे राघवेंद्रला भारतातच राहवं लागेल. 

राघवेंद्र ऑस्ट्रेलियाला जाणार नाही

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, रघु रविवारीच्या फ्लाईटने यूएईला जाणार होता. परंतु कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तो यूएईला जाऊ शकणार नाही. सूंत्राने मुंबई मिररला अशी माहिती दिली आहे की, 'राघवेंद्र हा दुबईला गेलेला नाही आणि तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील जाणार नाही.'

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी बीसीसीआयने जम्बो टीम जाहीर केली आहे. आयपीएलनंतर तात्काळ या दौऱ्यासाठी संघातील खेळाडूंना जावं लागणार आहे. तसेच जे खेळाडू भारतीय संघात आहेत पण आयपीएलमध्ये नाहीत त्यांना देखील यूएईमध्ये बोलविण्यात आलं आहे. जिथे त्यांना क्वॉरंटाइन करण्यात येणार असून त्यानंतर ते संघामध्ये सामील होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने, तीन टी-20 सामने आणि चा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी