Team India Coach: सचिन, सौरभ, लक्ष्मण नाही, ‘ही’ समिती निवडणार टीम इंडियाचा नवा कोच?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 17, 2019 | 22:49 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. क्रिकेट सल्लागार समितीमधील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अंग काढून घेतले असल्याने स्टाफ कोण निवडणार असा प्रश्न आहे.

sachin tendulkar sourav ganguly vvs laxman
कोण निवडणार टीम इंडियाचा कोच?  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • क्रिकेट सल्लागार समितीतून सचिन, लक्ष्मण, गांगुलीने काढून घेतले अंग
  • टीम इंडियाचा नवा कोचिंग स्टाफ कोण निवडणार?
  • कपिल देव यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये नामुष्कीजनक पराभव स्वीकारलेल्या भारतीय टीमचा नवीन कोच कोण असावा, याची चिंता तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना लागली आहे. भारतीय संघाचा कोच निवडणं हा सध्या भारताचा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. आता या टीमचा कोच कोण निवडणार यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार कोचिंग स्टाफच्या नियुक्तीची जबाबदारी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने सध्या कोचिंग स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. क्रिकेट सल्लागार समितीकडे या स्टाफची नियुक्ती करण्याची जबाबदारी आहे. पण, या समितीमधील माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या समितीमधून अंग काढून घेतल्यामुळे आता नव्या कोचिंग स्टाफच्या नियुक्तीची जबादारी कोणावर असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय आहे कारण?

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समिती कोच आणि इतर नियुक्त्यांच्या जबाबदारीसाठी नेमण्यात आली होती. पण, हे तिन्ही खेळाडू आयपीएल संघाशी जोडले गेले असल्यामुळे नियुक्त्यांमध्ये त्यांचे हितसंबंध जोडले गेल्याची चर्चा सुरू होती. त्या मुद्द्यावरून या तिन्ही खेळाडूंनी या नियुक्त्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे स्पष्टीकरणही मागितले होते. आता वर्ल्ड कपनंतर विद्मान कोच रवी शास्त्री यांचा करार संपत आहे. त्यांच्या सोबतचा इतर स्टाफही बदलला जाणार आहे. अर्थात या सगळ्यांना पुन्हा अर्ज करण्याची मुभा आहे. पण, या कोचिंग स्टाफची नियुक्ती कोण करणार यावरून सस्पेन्स आहे.

‘आताच बोलणे घाईचे ठरणार’

या संदर्भात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती दिली. ते म्हणाले, ‘कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची कोचिंग स्टाफ निवडण्यासाठी अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. पण, त्यावर चर्चा सुरू आहे. आताच यावर काही बोलणे घाईचे ठरेल.’ तसेच या तिघांमधील एका सदस्याने ‘माझ्याकडे अधिकृत नियुक्तीपत्र आल्याशिवाय मी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. महिला क्रिकेट टीममधील वादानंतर कोच रमेश पवार यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांच्या जागी माजी क्रिकेटपटू डब्ल्यू वी रमण यांची नियुक्ती कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनीच केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Team India Coach: सचिन, सौरभ, लक्ष्मण नाही, ‘ही’ समिती निवडणार टीम इंडियाचा नवा कोच? Description: Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. क्रिकेट सल्लागार समितीमधील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अंग काढून घेतले असल्याने स्टाफ कोण निवडणार असा प्रश्न आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...