Team India No.1 in all formats of Cricket : आयसीसीचे ताजे टीम रँकिंग जाहीर झाले आहे. या रँकिंगनुसार टीम इंडिया टेस्ट, वन डे आणि टी 20 या तिन्ही प्रकारांमध्ये नंबर वन झाली आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये 115, वन डे मध्ये 114 आणि टी 20 मध्ये 267 रेटिंग्ससह टीम इंडिया आयसीसी टीम रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मागील काही दिवसांपासून टीम इंडिया वन डे आणि टी 20 या दोन प्रकारांमध्ये पहिल्या नंबरची टीम होती. टेस्ट क्रिकेट या प्रकारात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानी अशी स्थिती होती. पण भारताने नागपूर टेस्ट 1 डाव आणि 132 धावांनी जिंकली. या मोठ्या विजयामुळे भारताचा फायदा झाला. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टीम इंडिया आयसीसी टेस्ट क्रिकेटच्या टीम रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आली. आता ऑस्ट्रेलिया 111 रेटिंग्ससह दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंड 106 रेटिंग्ससह तिसऱ्या स्थानी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023' ही 4 टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट मॅच नागपूरमध्ये झाली. ही मॅच 1 डाव आणि 132 धावांनी जिंकून भारताने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी टेस्ट मॅच शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 पासून दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. ही मॅच जिंकल्यास भारत 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023' ही 4 टेस्ट मॅचची सीरिज 2-0 अशी जिंकेल. यामुळे दुसऱ्या टेस्ट मॅचचे महत्त्व वाढले आहे.
दिल्ली टेस्ट होण्याआधी श्रेयस अय्यर फिट झाल्याचे वृत्त आले आहे. आता टीम इंडियाच्या रँकिंगबाबतही आनंदाची बातमी आली आहे. दोन चांगल्या बातम्या आल्यामुळे टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे चित्र आहे.
WPL : T20 वर्ल्ड कप खेळत असलेल्या या भारतीय महिला क्रिकेटपटूंना झाला फायदा
Test Match जी फक्त 10 बॉलमध्येच संपली
भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजार, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, ईशान किशन, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच धरमशाला ऐवजी इंदूरमध्ये होणार आहे. धरमशाला येथील स्टेडियमच्या आऊटफिल्ड आणि ड्रेनेज सिस्टिममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर अद्याप धरमशालाचे मैदान आंतरराष्ट्रीय मॅचसाठी सज्ज झालेले नाही. यामुळे तिसरी टेस्ट मॅच धरमशाला ऐवजी इंदूरमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.