T20 World Cup:वर्ल्डकपमधून बाहेर पडली टीम इंडिया, मीम्स होतायत व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2021 | 13:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup: अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर झालेल्या विजयानेच भारताचे सेमीफायनलचे दरवाजे उघडणार होते. मात्र असे घडले नाही. टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर पडली. 

team india
वर्ल्डकपमधून बाहेर पडली टीम इंडिया, मीम्स होतायत व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडल्याने चाहते वेगवेगळ्या अंदाजात आपला राग व्यक्त करत आहेत
  • काही चाहते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला राग काढत आहेत.
  • काही मीम्सच्या माध्यमातून टीम इंडियाला ट्रोल करत आहेत. पियुष चावलानेही पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबई: न्यूझीलंडने(new zealand) अफगाणिस्तानवर(afganistan) विजय मिळवल्याने भारतीय क्रिकेट प्रेमींची(indian cricket fans) साफ निराशा झाली. भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडल्याने चाहते वेगवेगळ्या अंदाजात आपला राग व्यक्त करत आहेत. काही चाहते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला राग काढत आहेत. तर काही मीम्सच्या माध्यमातून टीम इंडियाला ट्रोल करत आहेत. पियुष चावलानेही पोस्ट शेअर केली आहे. team india out of world cup, memes viral on social media

या लिस्टमध्ये भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचेही नाव सामील आहे.

सेहवागनेही मीम्सच्या माध्यमातून टीम इंडियावर टीकास्त्र सोडले आहे. सेहवागने भारत वर्ल्डकपमदून बाहेर पडल्यावर लिहिले आहे की, संपले, बाय-बाय, टाटा गुड बाय'. 

सिनेमांचे सीन्स टाकूनही टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे. 


पाकिस्तान सरकारमध्ये सूचना तसेच प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीम इंडियाला ट्रोल केले आहे. त्यांनी लिहिले, जर टीम इंडियाने नामिबियाला ३ ओव्हरमध्ये हरवले तर ते लवकर एअरपोर्टला पोहोचतील. 


एका युझरने तर टीम इंडियाची खिल्ली उडवताना म्हटले की आताही विश्वास बसत नाही की टीम इंडिया बाहेर झाली आहे. 

एका युझरने तर भारताच्या आशांवर पाणी फेरल्यामुळे अफगाणिस्तानला दोष दिला आहे. 


अफगाणिस्तानवर टिकल्या होत्या भारताच्या आशा

टी-२० वर्ल्डकपमधील सुरूवातीचे दोन सामने हरल्यानंतरच टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत होती. त्यांची एकमेव आशा होती ती अफगाणिस्तानवर. कारण अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले असते आणि भारताने नामिबियाला तर न्यूझीलंड आणि भारताचे सारखे गुण झाले असते. आणि नेट रनरेटच्या जोरावर भारताला सेमीफायनल गाठता आली असती. पाकिस्तानने आधीच न्यूझीलंडला हरवले होते. त्यामुळे भारताच्या आशा अफगाणिस्तानच्या विजयावर होत्या. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी