वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा, निवड समितीला शोधावी लागणार 'या' प्रश्नांची उत्तरे

Team India selection: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज (21 जुलै) घोषणा केली जाणार आहे. मात्र निवड करण्यापूर्वी टीम इंडियाच्या निवड समितीसमोर अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरे त्यांना शोधावी लागणार आहेत.

Team India Selection Committee
बीसीसीआय निवड समिती (फोटो सौजन्य: बीसीसीआय)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • ऑगस्ट महिन्यात सुरू होणार वेस्ट इंडिज दौरा
  • धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर
  • विराट क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार

मुंबई: एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीची बैठक होत आहे. या बैठकीत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. तीन ऑगस्ट पासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मॅचेस, 3 वन-डे आणि 2 टेस्ट मॅचेस खेळणार आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार, निवड समितीची बैठक 19 जुलै रोजी होणार होती. मात्र, नंतर ही बैठक रद्द करुन पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज (21 जुलै) रोजी निवड समितीची मुंबईत बैठक होत आहे. निवड समिती या बैठकीत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी टीम इंडियाची निवड करणार आहे. मात्र, यावेळी निवड समितीला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. पाहूयात कुठले आहेत हे प्रश्न...

धोनीचा पर्याय कोण?

महेंद्रसिंह धोनी याने आपल्या निवृत्तीच्या बातम्यांना पूर्णविराम देत शनिवारी वेस्ट इंडिज दौऱ्यात नसल्याचं जाहीर केलं. तसेच पुढील दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचंही धोनी सांगितलं. त्यामुळे आता धोनीच्या जागेवर टीममध्ये कुणाला संधी द्यायची या प्रश्न आहे. धोनीच्या जागेवर टीममध्ये रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा या दोघांपैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. रिद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाल्याने टीममध्ये रिषभ पंतला एन्ट्री मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा फिट झाल्याने रिद्धिमान साहा आपली दावेदारी करत आहे. टी-20, वन-डे आणि टेस्ट टीमसाठी दोघांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?

वन-डे क्रिकेटमध्ये बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर कुठल्या प्लेअरला खेळवायचं? हा प्रश्न टीम इंडियासमोर आहे. वर्ल्ड कप दरम्यान सुद्धा टीम इंडियाला हाच प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचं निवड समितीसमोर आव्हान असणार आहे. अशात आता युवा प्लेअर्सला या जागेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या नावांचा समावेश आहे. सोबतच मयंक अग्रवाल याला सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच रिषभ पंत हा सुद्धा चौथ्या क्रमांकाच्या रेसमध्ये असणार आहे.

बुमराहच्या जागी कोण?

वर्ल्ड कप दरम्यान उत्कृष्ट बॉलिंग करणाऱ्या बुमराहला या सीरिज दरम्यान आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी टीम इंडिया ए कडून वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगलं प्रदर्शन केलेल्या खलील अहमद याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना सुद्धा टीममध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर स्पिनरची जबाबदारी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यावर असणार आहे.

विजय शंकरला पुन्हा संधी?

दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झालेल्या ऑलराऊंडर विजय शंकर याला पुन्हा टीम इंडियात संधी मिळणार की ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांना संधी मिळणार हे आज स्पष्ट होईल. कृणाल पांड्या याला सुद्धा ऑलराऊंडर म्हणून वन-डे टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

नव्या टेस्ट ओपनर्सचा शोध?

शिखर धवन अद्यापही फिट झालेला नाहीये आणि पृथ्वी शॉ सुद्धा मुंबई प्रीमिअर लीग दरम्यान दुखापतग्रस्त झाला असून फिट नाहीये. त्यामुळे टेस्ट मॅचमध्ये ओपनिंगसाठी मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा, निवड समितीला शोधावी लागणार 'या' प्रश्नांची उत्तरे Description: Team India selection: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज (21 जुलै) घोषणा केली जाणार आहे. मात्र निवड करण्यापूर्वी टीम इंडियाच्या निवड समितीसमोर अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरे त्यांना शोधावी लागणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...