राहुल द्रविडने लाजिरवाण्या पराभवानंतर सांगितले अॅडलेडमध्ये टीम इंडियाचा किती स्कोर हवा होता?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2022 | 11:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahul Dravid press conference:टीम इंडियाला टी20 वर्ल्‍ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या हाती पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या पराभवासोबतच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारताचे मुख्य राहुल द्रविड यांनी सांगितले की अॅडलेडमध्ये रोहित शर्माच्या संघाला किती स्कोर करायला हवा होता. 

rahul dravid
टीम इंडियाने अॅडलेडमध्ये इतका स्कोर करायला हवा होता - द्रविड 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये 10 विकेटनी पराभव
  • भारतीय संघाचा सध्याच्या वर्ल्डकपमधील प्रवास संपुष्टात
  • हेड कोच राहुल द्रविडनी सांगितले टीमला किती स्कोर करणे गरजेचे होते. 

मुंबई: भारतीय संघाला (India Cricket team) गुरूवारी टी20 वर्ल्‍ड कप (T20 World Cup)च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध  (England Cricket team)10 विकेटनी पराभव सहन करावा लागला. यासोबतच भारतीय संघाचा 15 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे स्वप्नही अधुरे राहिले. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचा या वर्ल्डकपमधील प्रवास संपला. टीम इंडियाचे हेड कोच राहुल  (Rahul Dravid)ने मान्य केले की त्यांच्या संघाने अॅडलेडच्या पिचवर कमीत कमी  180 ते 185चा स्कोर करायला हवा होता. तसेच इंग्लंडने प्रत्येक विभागात त्यांच्यावर मात केली. team india should make this score in semifinal says rahul dravid

अधिक वाचा - संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी

अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतावर  10 विकेटनी मात केली. राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितले, सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे निश्चितच निराश झालोय. मात्र पुढे जायचे आहे. इंग्लंडने आम्हाला प्रत्येक विभागात हरवले. इंग्लंड संघाने तीनही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. आम्ही चांगली फलंदाजी केली. आमचा संघ असा आहे ज्यांनी स्पर्धेत दोन ते तीन वेळा  180 अथवा त्यापेक्षा जास्त स्कोर केला. जेव्हा आम्ही सुरूवात केली तेव्हा मुलांनी सांगितले की पिच चिकचिकीत आणि धीमी होती. 

तो पुढे म्हणाला, 15व्या ओव्हरपर्यंत आम्ही साधारण 15-20 धावा मागे होतो. शेवटच्या ओव्हरमध्ये आम्ही चांगली फलंदाजी केली. हार्दिकने चांगली खेळी केली. अखेरीस आमचा स्कोर 180 ते 185 इतका असायला हवा होता. आम्ही काही चांगला टी20  आंतरराष्ट्रीय खेळ केला. मात्र आजची आमची कामगिरी पुरेशी नव्हती. मला विश्वास आहे की आम्ही ही निराशा मागे टाकत पुढे जाऊ.  

भारताचा 10 विकेटनी पराभव

अॅडलेड ओव्हल मैदानावर जोस बटरने टॉस जिंकला आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजीस बोलावले. भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 168 धावा केल्या. यावेळी टीम इंडियाच्या दोन फलंदाजांनी अर्धशतक ठोकले. हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. हार्दिकने 33 बॉलवर 63 धावांची खेळी केली तर विराटने 40बॉलमध्ये 50  धावा केल्या. यानंतर इंग्लंडने एकही विकेट न गमावता 16 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केले. कर्णधार जोस बटलरने 80 आणि अॅलेक्स हेल्सने 86 धावा केल्या आणि दोघेही नाबाद परतले.

अधिक वाचा - शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी20 वर्ल्‍ड कप 2022 चा फायनल सामना रंगणार आहे.दोन्ही संघांकडे दुसऱ्यांदा  टी20 चँपियन बनण्याची संधी आहे. याआधी केवळ वेस्ट इंडिजच्या संघाला दोनदा हा खिताब जिंकण्यात यश मिळाले आहे. 

 
  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी