मुंबई: भारताचा स्पिनर अक्षर पटेलने(axar patel) आपली गर्लफ्रेंड मेहा हिच्याशी साखरपुडा केला आहे. अक्षरने स्वत: इन्टाग्रामवर(instagram) याचे फोटो शेअर करत ही खास बातमी आपल्या चाहत्यांना दिली. अक्षरने २० जानेवारीला आपला २८वा वाढदिवस साजरा केला. त्याने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याशी संबंधित फोटोही शेअर केले आहेत. यानंतर चाहते तसेच अक्षरला टीम इंडियाच्या(team india) सहकाऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. Team india spinner axar patel engaged with his girlfriend meha
अक्षऱ पटेलने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर करत लिहिले की, ही जीवनाची नवी सुरूवात आहे नेहमीसाठी एकत्र झालो आहोत. तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहीन. अक्षऱ पटेलने यासोबतच आपली गर्लफ्रेंड मेहासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. यात दोघेही एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहेत. खरंतर, अक्षरने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान साखरपुड्यादरम्यान करण्याचे ठरवले होते. याचा अंदाज अक्षरच्या बर्थडे पार्टीच्या फोटोवरून लावता येतो.
या फोटोंमध्ये दिसत आहे की जेव्हा अक्षऱ आपली गर्लफ्रेंड मेहाला अंगठी घालत आहे तेव्हा पाठीमागे marry me असा बोर्ड लागला आहे. म्हणजेच आपला जन्मदिवस आठवणीत राहावा यासाठी ही सगळी तयारी करण्यात आली होती.
सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताच अक्षऱवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ऋषभ पंत, उमेश यादव आणि इशान किशन या क्रिकेटर्सनी त्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जयदेव उनादकटने अक्षरला गुजरातीमध्ये शुभेच्छा दिल्यात. यावर अक्षऱनेही मजेशीर उत्तर दिले आहे.
अक्षर, सध्या दुखापतग्रस्त आहे आणि स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तो द. आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही आहे. त्याची श्रीलंका दौऱ्यात खेळण्याचीही शक्यता कमी आहे. अशातच तो मैदानात कधी पुनरागमन करणार हे पाहावे लागेल. गेले वर्ष अक्षऱसाठी चांगले गेले. त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. या मालिकेतील ३ कसोटीत त्याने २७ विकेट घेतल्या होत्या आणि टीम इंडिया ३-१ने मालिका जिंकली होती.