वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात 'या' खेळाडूंना संधी

Team India for West Indies Tour: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Team India
भारतीय क्रिकेट टीम (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

 • टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा पुढील महिन्यात
 • वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाचा पहिलाच दौरा
 • दौऱ्यात तीन टी-20, तीन वन-डे आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार

मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी आज (21 जुलै) भारतीय क्रिकेट निवड समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने पत्रकार परिषद घेत टीमची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मॅचेस, 3 वन-डे मॅचेस आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे.

टीम इंडियात शिखर धवनचं पुनरागमन झालं आहे तर हार्दिक पांड्याला आराम देण्यात आला आहे. कॅप्टन विराट कोहली हा संपूर्ण दौऱ्यात असणार आहे. तर महेंद्रसिंह धोनीने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की तो या दौऱ्यात टीमसोबत नसणार. टी-20 क्रिकेट टीममध्ये राहुल चहल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. 

आयसीसी वर्ल्ड कप 2019 संपल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा आहे. विराट कोहलीच्या नेत्रृत्वात वर्ल्ड कप खेळलेल्या टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाला न्यूझीलंडच्या टीमने 18 रन्सने पराभूत केलं होतं.

भारतीय निवड समितीची पत्रकार परिषदेत केली टीमची घोषणा

टी-20 मॅचेससाठी टीम इंडिया 

 1. विराट कोहली (कॅप्टन) 
 2. रोहित शर्मा
 3. शिखर धवन 
 4. केएल राहुल
 5. श्रेयस अय्यर
 6. मनीष पांडे
 7. रिषभ पंत 
 8. कृणाल पांड्या
 9. रवींद्र जडेजा
 10. वॉशिंग्टन सुंदर
 11. राहुल चहर
 12. भुवनेश्वर कुमार
 13. खलील अहमद
 14. दीपक चहर
 15. नवदीप सैनी

वन-डे मॅचेससाठी टीम इंडिया 

 1. विराट कोहली (कॅप्टन) 
 2. रोहित शर्मा
 3. शिखर धवन 
 4. केएल राहुल
 5. श्रेयस अय्यर
 6. मनीष पांडे
 7. रिषभ पंत 
 8. रवींद्र जडेजा
 9. कुलदीप यादव
 10. युजवेंद्र चहल 
 11. केदार जाधव 
 12. मोहम्मद शमी 
 13. भुवनेश्वर कुमार
 14. खलील अहमद
 15. नवदीप सैनी

टेस्ट मॅचेससाठी टीम इंडिया 

 1. विराट कोहली (कॅप्टन) 
 2. अजिंक्य रहाणे
 3. मयंक अग्रवाल 
 4. केएल राहुल
 5. चेतेश्वर पुजारा
 6. हनुमा विहारी
 7. रोहित शर्मा
 8. रिषभ पंत 
 9. रिद्धिमान साहा 
 10. आर अश्विन 
 11. रवींंद्र जडेजा
 12. कुलदीप यादव 
 13. इशांत शर्मा
 14. मोहम्मद शमी
 15. जसप्रीत बुमराह 
 16. उमेश यादव 

असा आहे टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा

तीन टी-20 मॅचेस

 1. पहिली टी-20 मॅच - 3 ऑगस्ट रोजी
 2. दुसरी टी-20 मॅच - 4 ऑगस्ट रोजी 
 3. तिसरी टी-20 मॅच - 6 ऑगस्ट रोजी

तीन वन-डे मॅचेस

 1. पहिली वन-डे मॅच - 8 ऑगस्ट रोजी
 2. दुसरी वन-डे मॅच - 11 ऑगस्ट रोजी 
 3. तिसरी वन-डे मॅच - 14 ऑगस्ट रोजी

दोन टेस्ट मॅचेस 

 1. पहिली टेस्ट मॅच - 22 ऑगस्ट रोजी
 2. दुसरी टेस्ट मॅच - 30 ऑगस्ट रोजी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात 'या' खेळाडूंना संधी Description: Team India for West Indies Tour: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...