न्यूझीलंडच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शॉच्या वनडे डेब्यूवरही शिक्कामोर्तब

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Feb 04, 2020 | 18:22 IST | टाइम्स नाऊ हिंदी

टीम इंडिया सध्या न्यूझिलंडच्या दौऱ्यावर आहे. टी-२० मध्ये न्यूझीलंडला ५-०नं पराभूत करत टीम इंडियानं विजयाची दमदार सुरूवात केलीय. आता टीम इंडियाची टेस्ट सीरिजची घोषणा झालीय. तसंच पृथ्वी शॉ वनडे डेब्यू करणार आहे.

Prithvi Shaw
न्यूझिलंड-टीम इंडिया टेस्ट टीमची घोषणा, पृथ्वी शॉचा वनडे डेब्यू 

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजची घोषणा
  • न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेतून पृथ्वी शॉ करणार डेब्यू
  • के एल राहुल मिडल ऑर्डर सांभाळणार, तर टेस्टसाठी शुभमन गिलला रोहित शर्माच्या जागी संधी

India vs New Zealand, 1st Odi: हॅमिल्टन: टीम इंडियाचा स्टार ओपनर रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये नव्या दमाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉचं आगमन होतंय. कॅप्टन विराट कोहलीनं याबाबत घोषणा केलीय. यापूर्वी पृथ्वीला जखमी शिखर धवनचा पर्याय म्हणून टीममध्ये घेतलं गेलं होतं. आता तो आपल्या पहिल्या वनडेमध्ये ओपनरची जबाबदारी सांभाळणार आहे. तर रोहित शर्मा ऐवजी टीममध्ये मयंक अग्रवालला घेतलं गेलं आहे.

विराट कोहलीनं पहिल्या वनडे पूर्वी पत्रकारांसोबत बातचित केली. त्यावेळी विराट म्हणाला, ‘ही वाईट बातमी आहे की, रोहित शर्मा वनडे सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. त्याची खेळी सर्वांना बघायची होती. वनडे क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ निश्चित ओपनिंग करेल. तर के एल राहुल मिडिल ऑर्डरमध्ये बॅटिंग करेल. राहुल मिडिल ऑर्डरमध्ये खेळून टीमला मजबूती देण्याचं काम करेल’, असंही विराट म्हणाला.

विराट पुढे म्हणाला, ‘या टीमचं सरासरी वय २७ वर्ष आहे. आम्हाला आपली फिल्डिंग चांगली ठेवायची आहे. गेल्या सीरिजमध्ये दोन्ही टीम्सची फिल्डिंग चांगली नव्हती. टी-२०मध्ये असं होऊ शकतं कारण आपण घाबरून जातो. पण वनडेमध्ये खराब फिल्डिंगची अपेक्षा नाही.’

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वनडे सीरिजचा संपूर्ण कार्यक्रम

  • ५ फेब्रुवारी (बुधवारी): पहिली वनडे, हॅमिल्टन, भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता मॅच सुरू होईल.
  • ८ फेब्रुवारी (शनिवार): दुसरी वनडे, ऑकलँड, भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता मॅच सुरू होईल.
  • ११ फेब्रुवारी (मंगळवार): तिसरी वनडे, माउंट मॉनगनुई, भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता मॅच सुरू होईल.
  • न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

बीसीसीआयनं मंगळवारी न्यूझीलंड विरुद्धच्या दोन मॅचच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केलीय. टीम इंडियामध्ये तरुण खेळाडू पृथ्वी शॉचं पुनरागमन झालंय. तर जखमी रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली आहे. इशांत शर्माचं नाव सुद्धा टीममध्ये आहे, मात्र त्याच्या फिटनेसबाबत अजून शंका आहे. टी-२०मध्ये दमदार प्रदर्शन करणारा नवदीप सैनीला सुद्धा टेस्ट टीममध्ये सहभागी करून घेतलंय. पण विशेष म्हणजे के एल राहुलला दमदार प्रदर्शनानंतरही टेस्ट सीरिजमध्ये संधी मिळाली नाहीय.

टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया अशाप्रकारे आहे

विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कॅप्टन), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा (फिटनेसवर अवलंबून).

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा टेस्ट सीरिजचा दौरा
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...