T20 World Cup 2022: बांगलादेशविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 31, 2022 | 14:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dinesh karthik injured: वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त होत मध्येच सामना सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. 

team india
बांगलादेशविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिकेच्या 15व्या ओव्हरदरम्यान दिनेश कार्तिकच्या पाठीला त्रास होऊ लागला.
  • या ओव्हरच्या समाप्तीनंतर दिनेश कार्तिक खूपच त्रास सहन करत असल्याचे दिसला.
  • त्याने आपली पाठ पकडली होती. यानंतर फिजिओ मैदानावर आले मात्र कार्तिकच्या पाठीचा त्रास कमी झाला नाही

मुंबई: टीम इंडिया(team india) सध्या खेळाडूच्या दुखापतीने ग्रस्त आहे. आता द. आफ्रिकेविरुद्ध रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकही(dinesh karthik) दुखापतीने ग्रस्त झाला. यामुळे कार्तिकला अर्ध्यावरच सामना सोडावा लागला. कार्तिकच्या जागी ऋषभ  पंतने(rihabh pant) विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली. पंत द. आफ्रिकेविरुद्ध सामन्यात प्लेईंग 11चा भाग नव्हता.team india trouble increased after Dinesh Karthik injured

अधिक वाचा - सत्तार यांच्या बॉलिंगवर खासदार इम्तियाज जलील क्लीन बोल्ड

द. आफ्रिकेच्या 15व्या ओव्हरदरम्यान दिनेश कार्तिकच्या पाठीला त्रास होऊ लागला. या ओव्हरच्या समाप्तीनंतर दिनेश कार्तिक खूपच त्रास सहन करत असल्याचे दिसला. त्याने आपली पाठ पकडली होती.यानंतर फिजिओ मैदानावर आले मात्र कार्तिकच्या पाठीचा त्रास कमी झाला नाही आणि फिजिओसह पॅव्हेलियनमध्यये परतला. 

भुवनेश्वर कुमारने कार्तिकच्या दुखापतीबाबक सांगितले, त्याच्या पाठीला त्रास होत होता आणि सामन्यानंतर मी त्याला नाही भेटलो. फिजिओचा रिपोर्ट आल्यानंतरच काही सांगता येऊ शकेल. भारताला सुपर 12मध्ये आपला पुढील सामना दोन नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये खेळायचा आहे. अशातच कार्तिक या सामन्यात खेळू शकणार नाही. 

तामिळनाडूचा राहणारा दिनेश कार्तिकने द. आफ्रिकेविरुद्ध 15 बॉलमध्ये सहा धावा केल्या. 37 वर्षीय दिनेश कार्तिकला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खास कामगिरी करता आली नव्हती. तो केवळ एक धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. तर नेदरलँड्सविरुद्ध त्याला बॅटिंग करण्याची संधीच मिळाली नव्हती.

सध्याच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाशिवाय भाग घेत आहे. जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे तर बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपमध्ये सामील होऊ शकले नाहीत. तर स्टँडबाय म्हणून सामील करण्यात आलेला दीपक चाहरही दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला. 

अधिक वाचा - डेड स्किन-ब्लॅकहेड्सला म्हणा Bye-Bye, लावा हा फेस पॅक

द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 9 बाद 133 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने 40 बॉलमध्ये 68 धावांची खेळी केली. यात त्याने सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. याशिवाय कोणत्याही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने चार तर वेन पार्नेलने तीन विकेट मिळवल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी