टीम इंडियाने समुद्र किनाऱ्यावर दिली शर्टलेस पोझ, Abs पाहून फॅन्सने म्हटलं...

Team India players flaunt abs: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या टीममधील प्लेअर्ससोबत आणि सपोर्ट स्टाफसोबतचा एक बीचवरील फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून फॅन्सने काय म्हटलं पाहूयात...

Team India
टीम इंडिया   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीने पोस्ट केला टीम इंडियासोबतचा बीचवरील फोटो
  • टीम इंडियाने शर्टलेस होत दाखवले अॅब्स, चाहत्यांनी केल्या अनेक कमेंट्स
  • वेस्ट इंडिज विरुद्ध गुरुवारपासून टेस्ट सीरिजची सुरूवात

अँटिगा: टीम इंडियाचा कॅप्टन आणि स्टार बॅट्समन विराट कोहलीने अँटिगा येथून एक खास फोटो शेअर केला आहे. टीम इंडियाच्या या फोटोमध्ये भारतीय क्रिकेट टीममधील अनेक प्लेअर्स आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य दिसत आहेत. या सर्वांचा एक खास आणि वेगळा अंदाज या फोटोत आपल्याला पहायला मिळत आहे. विराट कोहलीने शेअर केलेला हा फोटो पाहून क्रिकेटप्रेमींमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे टीम इंडियातील प्लेअर्सच्या अॅब्स, फिट बॉडी आणि रोहित शर्माची.

टीम इंडियाच्या या फोटोमध्ये जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या दोघांचे अॅब्स खूपच खास दिसत आहेत. तर बुमराहच्या शेजारी उभ्या असलेला मयांक अग्रवाल सुद्धा या दोघांना अॅब्सच्या बाबतीत टक्कर देताना दिसत आहे. या फोटोत रोहित शर्मा सुद्धा दिसत आहे मात्र, नेहमी प्रमाणे तो यावेळी सुद्धा सर्वांच्या मागे दिसत आहे. रोहित शर्मा हा लोकेश राहुलच्या मागे दिसत आहे. टीम इंडियासोबत आता फास्ट बॉलर इशांत शर्मासुद्धा जॉईन झाला आहे.

विराट कोहलीने टीम इंडियाचा हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर क्रिकेटप्रेमींनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्रिकेटप्रेमींनी केलेल्या कमेंट्समध्ये रोहित शर्मा हा चर्चेचा विषय ठरत आहे. बऱ्याच दिवसांनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा असा फोटो समोर आला आहे ज्यामध्ये विराट आणि रोहित शर्मा एकत्र दिसत आहेत. यामुळेच क्रिकेटप्रेमी सुद्धा याकडे पाहून कमेंट्स करताना दिसत आहेत.






टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात गुरुवारपासून टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात टेस्ट सीरिजला सुरूवात होणार आहे. पहिली टेस्ट मॅच 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. गुरुवारी अँटिगामध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता टेस्ट सीरिजमधील पहिली मॅच सुरू होणार आहे. तर दुसरी टेस्ट मॅच 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यापूर्वी झालेल्या टी-20 सीरिज आणि वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत सीरिज आपल्या खिशात टाकली आहे. त्यानंतर आता टेस्ट सीरिजही जिंकण्याच्या तयारीत टीम इंडिया आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी