IND vs SA 2nd Test: अश्विनने सांगितले, जोहान्सबर्ग कसोटीत पुनरागमन करणार टीम इंडिया

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 04, 2022 | 16:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

india vs south africa test: टीम इंडियाने पहिल्या डावात २०२ धावा केल्या. अश्विनचे म्हणणे आहे की वांडरर्स स्टेडियच्या पिचवर हा स्कोर भले कमी झाला आहे. ममात्र टीम इंडियाची बॉलिंग स्ट्रेंथ पाहता टीम इंडिया पुन्हा पुनरागमन करू शकते.

r ashwin
जोहान्सबर्ग कसोटीत पुनरागमन करेल टीम इंडिया, आर. अश्विन  
थोडं पण कामाचं
  • सेंच्युरियन येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत द. आफ्रिकेला ११३ धावांनी हरवल्यानंतर टीम इंडियाची कामगिरी जोहान्सबर्गच्या पहिल्या कसोटीत निराशाजनक राहिली.
  • दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा डाव २०२ धावांवर आटोपला.
  • दुसऱ्या कसोटीत टीम इडिया पुनरागमन करेल असा अश्विनला विश्वास

मुंबई: टीम इंडियाचा स्टार स्पिनर(team india star spinner) आर. अश्विनने(r ashwin) म्हटले की भले पाहुण्या संघाला पहिल्या डावात २०२ धावा करता आल्या मात्र आताही सामन्यात पुनरागमन करण्याची संधी आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने(team india) टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिल्या डावात २०२ धावा केल्या. अश्विनचे म्हणणे आहे की वांडरर्स स्टेडियच्या पिचवर हा स्कोर भले कमी झाला आहे. ममात्र टीम इंडियाची बॉलिंग स्ट्रेंथ पाहता टीम इंडिया पुन्हा पुनरागमन करू शकतो. विराट कोहलीच्या(virat kohli) अनुपस्थितीत नेतृत्व करत असलेल्या लोकेश राहुलने(lokesh rahul) ५० आणि अश्विनने(r ashwin) भारताकडून ४६ धावांची खेळी केली. Team india will come back in second test against south africa

अश्विनला जेव्हा या मैदानावरील स्कोरबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, द. आफ्रिकेत हा चांगला स्कोर आहे हा खूप ट्रिकी प्रश्न आह. टॉस जिंकणे नेहमी चांगले असते आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना तुम्ही कमीत कमी २६० ते २७० धावा करण्याबाबत विचार करता. द. आफ्रिका नेहमी पहिल्यांदा फलंदाजी करतात आणि कमीत कमी २५० धावा केल्या असता आणि सामन्यावर पकड मजबूत राहिली असती. त्यामुळेच कदाचित आमचा स्कोर कमी झाला असेल मात्र आमच्याकडे चांगली बॉलिंग आहे आणि आशा करतो की दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर विकेट घेऊ. 

सेंच्युरियन येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत द. आफ्रिकेला ११३ धावांनी हरवल्यानंतर टीम इंडियाची कामगिरी जोहान्सबर्गच्या पहिल्या कसोटीत निराशाजनक राहिली. विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या कसोटीत खेळत नाही आहे त्याच्या जागी लोकेश राहुल नेतृत्व करत आहे. राहुलने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र टीम इंडियाचा डाव अवघ्या २०२ धावांवर आटोपला. राहुलने ५० धावा केल्या तर आर अश्विनने ४६ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजांचे योगदान राहिले नाही. प्रत्युत्तरात द. आफ्रिकेने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक बाद ३५ धावा केल्या आहेत. द. आफ्रिका अद्याप १६७ धावांनी पिछाडीवर आहे. मात्र त्यांच्या खात्यात ९ विकेट बाकी आहेत. 

मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त

भारत आणि द. आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या जोहान्सबर्ग कसोटीच्या अखेरच्या सत्रात टीम इंडियासाठी वाईट बातमी आली. दिवसाचा खेळ संपण्यासाठी सात बॉल शिल्लक होते. अशातच गोलंदाजीसाठी उतरत असलेल्या मोहम्मद सिराजला दुखापत झाली. तो आपल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल फेकत असताना मोहम्मद सिराज स्टम्पजवळ येऊन थांबला आणि त्याने आपला उजवी मांडी पकली. सिराजची ही स्थिती पाहून टीमचे फिजिओ नितीन पटेल आले आणि वेगवान गोलंदाजांला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. सामन्यात दुखापतीमुळे आधीच विराट कोहली बाहेर. त्यात आता सिराजच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची समस्या अधिकच वाढली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी