ICC Champions Trophy : पाकमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाणार का, जाणून घ्या काय म्हटले क्रीडामंत्री ठाकूर 

ICC Champions Trophy in Pakistan : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मंगळवारी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे सुपूर्द केले,  दोन दशकांहून अधिक काळानंतर पाकिस्तानात मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन होणार आहे. 

team india will go pakistan for champions trophy know what sports minister anurag thakur says
पाकमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाणार का?  
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मंगळवारी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे सुपूर्द केले
  •  दोन दशकांहून अधिक काळानंतर पाकिस्तानात मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन होणार आहे. 
  • 009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकन ​​संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेक आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता आलेले नाहीत.

Anurag Thakur on  Champions Trophy । नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मंगळवारी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे सुपूर्द केले,  दोन दशकांहून अधिक काळानंतर पाकिस्तानात मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन होणार आहे. 

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी सांगितले की,  पाकिस्तानात 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत सहभागी होणार की नाही, याबाबत योग्य वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.  आंतरराष्ट्रीय संघांना शेजारच्या देशात जाण्यासाठी सुरक्षेच्या समस्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मंगळवारी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे सुपूर्द केले, ज्याने दोन दशकांहून अधिक काळानंतर पाकिस्तानात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे पुनरागमन होणार आहे.

“सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या अनेक देशांनी तेथे जाण्यास नकार दिला आहे. तुम्हाला माहिती आहेच की, तिथे खेळताना खेळाडूंवर हल्ले झाले आहेत आणि ही मोठी समस्या आहे.

"जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते, तेव्हा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात," ते म्हणाले की, गृह मंत्रालय देखील निर्णय प्रक्रियेत सहभागी होईल. 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट खेळलेले गेले नाही.

 1996 च्या विश्वचषकाचे भारत आणि श्रीलंकेसोबत संयुक्त आयोजन करणाऱ्या पाकिस्तानला 2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकन ​​संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेक आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता आलेले नाहीत. अलीकडेच न्यूझीलंड आणि इंग्लंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा द्विपक्षीय दौरा मागे घेतला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी