BCCIने टीम इंडियाला जाहीर केला 'एवढ्या' कोटींचा बोनस

Australia vs India: कसोटी क्रिकेटमध्ये ब्रिस्बेनमधील भारताचा पहिला विजय आणि ऑस्ट्रेलियामधील दुसर्‍या कसोटी मालिकेतील विजय आहे. याच कामगिरीमुळे बीसीसीआयने भारतीय संघासाठी बोनस जाहीर केला आहे. 

team india
BCCIने  टीम इंडियाला जाहीर केला 'एवढ्या' कोटींचा बोनस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली
  • ब्रिस्बेनमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने मिळवला ऐतिहासिक विजय
  • गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात ३२ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला

मुंबई: टीम इंडियाने मंगळवारी ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की संघाला पाच कोटींचा बोनस देण्यात येईल. रिषभ पंतच्या (८९*) खेळीच्या जोरावर टीम इंडियाने मंगळवारी गाबा येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात तीन गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिका देखील २-१ने जिंकली. ऑस्ट्रेलियाला गाबा येथे 32 वर्षांनंतर कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

जय शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'बीसीसीआय घोषणा करत आहे की, टीम बोनस म्हणून ५ कोटी रुपये दिले जातील. हा भारतीय क्रिकेटसाठी एक खास क्षण आहे.  चारित्र्य आणि कौशल्य याचं उत्कृष्ट प्रदर्शन.'

जय शाह यांनी संपूर्ण संघाचे खरे चारित्र्य, लवचिकता आणि धैर्य यांचे कौतुक केले. तर या मालिकेदरम्यान संघाने ८ महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाले. शाह यांनी ट्वीट केले की, 'टीम इंडियाने या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये लवचिकता, संयम आणि दृढनिश्चय या शब्दांची नवीन व्याख्या तयार केली आहे. आपण संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. शब्बास अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री आणि सर्व मुलं. रिषभ पंत, मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांचा विशेष उल्लेख.'

ऐतिहासिक विजय

गाबा कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ३२४ धावांची आवश्यकता होती. रोहित शर्मा (७) लवकर बाद झाला होता. त्यामुळे भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली नव्हती. परंतु यानंतर, शुभमन गिल (९१), चेतेश्वर पुजारा (५६) आणि रिषभ पंत (८९*) यांनी भारताला ब्रिस्बेनमधील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्यास मदत केली.

भारतीय संघाने त्यांच्या कसोटी इतिहासातील तिसर्‍या सर्वोच्च लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी 1975/76 मध्ये भारताने वेस्ट इंडीज विरूद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे ४०६ च्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. तर त्यानंतर २००८-०९ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध ३८७ धावांचा पाठलाग केला होता. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे. यासह भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली आबे. तत्पूर्वी, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने 2018/19 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर 2-1 ने पराभूत केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी